---Advertisement---

रोहित-यशस्वी पुण्यात खेळत असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे वेळापत्रक!

On: मंगळवार, डिसेंबर 9, 2025 3:57 PM
---Advertisement---

भारतातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने आता मध्यावर आले आहे. 12 तारखेपासून स्पर्धेच्या नॉकआऊट सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकाहून एक रोमांचक सामने पहायला मिळाले. सूर्यकुमार यादव,हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मासारखे स्टार खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. आता पुण्यात 12 डिसेंबरपासून या स्पर्धेतील सुपर लीग सामन्यांना सुरूवात होणार आहे. तर 18 डिसेंबरला स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे.

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीतील सुपर लीग आणि अंतिम फेरीतील सामने याआधी इंदुरमध्ये खेळवले जाणार होते. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार कोलकाता, हैदराबाद , अहमदाबाद आणि लखनौत झाले. तर सुपर लीग फेरीतील सामन्यांचं आणि अंतिम फेरीतील सामन्याचं ठिकाण आता बदलण्यात आलं आहे. हे सामने इंदुरऐवजी आता पुण्यात खेळवले जाणार आहेत. याला लॉजिस्टीक हे कारणं ठरलं.

आता अनेक दिग्गज क्रिकेटपटू हे पुण्यात येणार आहेत. त्यात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन वगैरेचा समावेश आहे. हे सामने एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे पुणे व डीवायपाटील क्रिकेट अकादमी, आंबी येथे होणार आहेत.

या स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
(नॉकआउट्स & फायनल)

आंध्र प्रदेश विरुद्ध मध्य प्रदेश
12 डिसेंबर, सकाळी 9:00
डी वाय पाटील अकॅडमी, आंबी, पुणे

हरियाणा विरुद्ध राजस्थान
12 डिसेंबर, सकाळी 11:00
एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे

पंजाब विरुद्ध झारखंड
12 डिसेंबर, दुपारी 1:30
डी वाय पाटील अकॅडमी, आंबी, पुणे

मुंबई विरुद्ध हैदराबाद
12 डिसेंबर, सायंकाळी 4:30
एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे

मुंबई विरुद्ध हरियाणा
14 डिसेंबर, सकाळी 9:00
डी वाय पाटील अकॅडमी, आंबी, पुणे

आंध्र प्रदेश विरुद्ध पंजाब
14 डिसेंबर, सकाळी 11:00
एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे

हैदराबाद विरुद्ध राजस्थान
14 डिसेंबर, दुपारी 1:30
डी वाय पाटील अकॅडमी, आंबी, पुणे

मध्य प्रदेश विरुद्ध झारखंड
14 डिसेंबर, सायंकाळी 4:30
एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे

मध्य प्रदेश विरुद्ध पंजाब
16 डिसेंबर, सकाळी 9:00
डी वाय पाटील अकॅडमी, आंबी, पुणे

मुंबई विरुद्ध राजस्थान
16 डिसेंबर, सकाळी 11:00
एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे

आंध्र प्रदेश विरुद्ध झारखंड
16 डिसेंबर, दुपारी 1:30
डी वाय पाटील अकॅडमी, आंबी, पुणे

हैदराबाद विरुद्ध हरियाणा
16 डिसेंबर, सायंकाळी 4:30
एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे

फायनल
एसएल गट अ संघ 1 विरुद्ध एसएल गट ब संघ 1
18 डिसेंबर, सायंकाळी 4:30
एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे, पुणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---