जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आंबेगाव यांच्या संयुक्त विदयमाने आयोजन
पुणे : जिल्हास्तरीय योगासने स्पर्धेत सनी आदक, धनश्री व्यवहारे, सुरज पांड्ये, वैष्णवी ठोंबरे, पार्थ साळवे, आर्या गोगावले यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकाविले. आंबेगाव येथील सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल येथे ही स्पर्धा पार पडली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आंबेगाव यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शाळेच्या प्राचार्या शितल सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडाप्रमुख निनाद येनपुरे, रमेश मांडवकर, विवेक साबळे, मनाली देव, श्रद्धा कुलकर्णी, नयना जोशी आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा योगा संस्थेमार्फत स्पर्धेचे परिक्षण झाले. विजेत्या प्रथम तीन क्रमांकास पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकूण १३ तालुक्यातील ५४६ मुले आणि मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला. वयवर्षे १४, १७ आणि १९ या वयोगटात ही स्पर्धा झाली.
निकाल-प्रथम ५ क्रमांक : १९ वर्षांखालील मुले : १) सनी आदक (जुन्नर) २)वरद माने (बारामती) ३) कल्पेश लांडगे (शिरुर) ४)रोहित बाबर (खेड) ५)रितेश पुजारी (जुन्नर), १९ वर्षांखालील मुली – १) धनश्री व्यवहारे २)शिवानी नागवडे ३)प्रतिक्षा कटके ४)वृषाली शेटे ५) अनुजा साळुंके (सर्व बारामती)
१७ वर्षांखालील मुले – १) सुरज पांड्ये(शेल पिंपळगाव) २) सुरज वराळे (शिरुर) ३) शंतनु गावडे (बारामती) ४) कृष्णल काळे (बारामती) ५)ओंकार नेर्लेकर (बारामती) , १७ वर्षांखालील मुली – १) वैष्णवी ठोंबरे २) प्रज्ञा पिसे ३) पुनम सरडे ४)प्रियांका शिंदे ५) पुजा मुळे. (सर्व बारामती)
१४ वर्षांखालील मुले – १) पार्थ साळवे (बारामती) २) सुशांत साळवे (बारामती) ३) अथर्व थोरात (आंबेगाव) ४) सुयश चौधरी (बारामती) ५) यश माडे (बारामती), १४ वर्षांखालील मुली – १) आर्या गोगावले (मावळ) २) स्नेहल गोडगे (बारामती) ३) साक्षी सरडे (बारामती) ४) प्रिती अतकरे (बारामती) ५) सायली बोंडगे (मुळशी)