नवी दिल्ली: खो खो फेडरेशन ऑफ इंडिया (केकेएफआय) आणि अल्टिमेट खो खो (यूकेके) यांच्या माध्यमातून क्रीडा विज्ञान-आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खेळात उत्कृष्ट काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या तंदुरुस्तीच्या विविध बाबींचा शोध घेण्यासाठी देशातील अव्वल खो खो खेळाडू प्रथमच आयोजित वैज्ञानिक उच्च कार्यक्षमता राष्ट्रीय शिबिरात जवळजवळ चार आठवड्यांपासून व्यस्त आहेत.
तज्ज्ञांच्या दृष्टीने खेळाडूंना कठोर प्रशिक्षण दिल्यानंतर सध्या चालू असलेल्या 30 दिवसांच्या शिबिरामध्ये स्पर्धात्मक खो खो च्या दृष्टीने चांगली तयारी पहायला मिळाली. कारण केकेएफआयची 2021 सुपर लीग खो खो स्पर्धा 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. 138 खेळाडूंचे दहा गटात विभाजन करण्यात आले आहे (पुरुषांसाठी आठ आणि महिलांसाठी दोन) या स्पर्धेत आगामी अल्टिमेट खो खो यांच्या नवीन खेळाच्या नियमांसह सामने खेळण्यात येणार असून खो खोचा खेळ पुन्हा कधीच झाला नव्हता तितका वेगवान प्रकार यावेळी पाहण्यास मिळेल.
चालू असलेल्या वैज्ञानिक शिबिरादरम्यान, आम्ही दुरुस्त केलेल्या तंत्रांचे आवश्यक मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य आत्मसात करण्यासाठी खेळाडूंची एकूण तंदुरुस्ती आणि शारीरिक क्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या सुपर लीगच्या माध्यमातून वास्तविक सामन्यांच्या परिस्थितीत प्रत्येक खेळाडूच्या मानक आणि पातळीचे मूल्यांकन करण्याचे आमचे लक्ष्य आहे. तज्ञ नंतर सर्व डेटाचे वैज्ञानिक विश्लेषण करतील आणि प्रत्येक खेळाडूसाठी मूल्यांकन व कामगिरीचे ग्रेड तयार करतील.
तसेच येत्या काही दिवसांत आमच्याकडे परिपूर्ण जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा पूल तयार होईपर्यंत आम्ही सहा-सात महिने त्यांचे निरीक्षण व अभ्यासक्रम सुरू ठेवू. असे केकेएफआयचे अध्यक्ष सुधांशु मित्तल म्हणाले. सध्या सुरू असलेल्या शिबिरामध्ये क्रीडा फिजिओथेरपी, बायोमेकेनिक्स, बायोकिनेटिक्स, क्रीडा कामगिरीचे विश्लेषण, कामगिरीचे विश्लेषण खेळाच्या निष्कर्ष आणि मापदंडाच्या आधारे खेळाडूंचे परीक्षण केले गेले. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता कमी झाली.
सर्व विश्लेषण आणि मार्गदर्शनाने खेळाडूंनी प्रभावी प्रगती केली आहे. आमची लीगमध्ये ओळख व्हावी या उद्देशाने खो खो या नव्या स्वरूपात अंगवळणी पडण्याचे प्रशिक्षणही त्यांनी दिले आहे. येत्या काही दिवसांत जेव्हा खेळाडू सामने खेळत असतात, तेव्हा आम्ही टीव्ही उत्पादन म्हणून हा खेळ कसा पुढे नेण्यात येईल हे पाहण्यासाठी मल्टि कॅमेराद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहोत, असे अल्टीमेट खो खोचे सीईओ तेनझिंग नियोगी म्हणाले.
केकेएफआयच्या 2021 सुपर लीग खो खो स्पर्धेत विजयी संघांसाठी बक्षीस रक्कम असेल. या स्पर्धेत १२० खेळाडू दिसणार असून यामध्ये पुरुष संघात जगुआर, निन्जास, रायनोज, चित्ता, फ्रिस्की रेंजर्स, पँथर्स, पहाडी बिल्ला आणि शार्क अशी नावे आहेत आणि त्यांना दोन गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक संघ आपल्या गटातील संघाविरुद्ध सामना खेळातील आणि दोन्ही गटातील अव्वल दोन संघ 15 फेब्रुवारीला होणाऱ्या उपांत्यफेरीत सहभागी होतील त्याच दिवशी अंतिम सामना खेळविण्यात येईल.18 महिला खेळाडूंचे दोन संघात विभाजन करण्यात आले असून ते दिवसातून एक सामना खेळतील आणि जास्तीत जास्त विजय मिळविणारा संघ विजयी घोषित केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो महान गोलंदाज आहे आणि वयानुसार…,’ अंडरसनविषयी ट्विट करत स्टेनने संपवल तुलनेचं सत्र
आपल्याच नात्यातील मुलीवर झाले होते सेहवागला प्रेम, घरच्यांच्या विरोधानंतरही यशस्वी ठरली लव्हस्टोरी
‘तो महान गोलंदाज आहे आणि वयानुसार…,’ अंडरसनविषयी ट्विट करत स्टेनने संपवल तुलनेचं सत्र