इंग्लंडच्या भूमीवर सर्वांना आपल्या खेळाचे चाहते बनवणारे भारतीय संघाचे स्टार खेळाडू शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी यूएईला पोहोचले आहेत. त्यांच्यासह इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली देखील दुबईत पोहचला आहे. तर, सॅम करनही लवकरच दुबईला येईल. हे पाच खेळाडूही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतात.
चेन्नई सुपर किंग्सने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या चारही खेळाडूंना पुढील सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. शार्दुलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. या आयपीएलमध्येही तो सीएसकेसाठी याच पद्धतीने खेळ खेळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना राहील. इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नईला १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे.
En-coming 💛
4 times the joy today at Whistles Kingdom! #WhistlePodu #Yellove 🦁 @imjadeja @russcsk pic.twitter.com/eoAMJdKijj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 12, 2021
रवींद्र जडेजाने ओव्हल कसोटीत आपल्या गोलंदाजीने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि आयपीएलमध्ये तो सीएसकेचे ट्रम्प कार्ड आहे. स्पर्धा पुढे ढकलण्याआधी पहिल्या टप्प्यात जडेजाने त्याच्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने भरपूर टाळ्या मिळवल्या होत्या. आरसीबीविरुद्ध खेळलेल्या सामन्यात हर्षल पटेलच्या एकाच षटकात ३६ धावा झोडल्या होत्या. जडेजाने ७ सामन्यांमध्ये १६१.७२च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने १३१ धावा केल्या आणि गोलंदाजीत ६ विकेट्सही घेतल्या आहेत.
The Style 😎, The Charm 🙃, The Fire 🔥, & The Grace 😌!
All in 4 the party to begin! 🥳#WhistlePodu #Yellove 🦁💛 @imjadeja @imShard @cheteshwar1 pic.twitter.com/HDY88gLZm9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 12, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर सर्व फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना खासगी चार्टर्ड विमानाने यूएईमध्ये आणत आहेत.
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहलीसारखे खेळाडू आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आधीच यूएईला पोहोचले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा शनिवारी ११ सप्टेंबरला बुमराह आणि सूर्यकुमारसह चार्टर्ड विमानाने अबू धाबीला पोहोचला होता.
आयपीएलचे उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत आणि स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी दुबईत खेळला जाईल. अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयला ४ मे रोजी आयपीएल २०२१ पुढे ढकलावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेसिसची भविष्यवाणी! ‘हे’ तिघे विश्वचषकात ठरणार दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्पकार्ड
जोकोविचला ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याची संधी, पण नक्की हे आहे तरी काय? घ्या जाणून
मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर अँडरसन म्हणाला, “क्रिकेटसाठी ही लाजिरवाणी गोष्ट…”