---Advertisement---

एकदा १०० तर दुसऱ्यांदा ०, या खेळाडूबरोबर आयपीएलमध्ये झाला गजब विक्रम

On: बुधवार, मे 23, 2018 9:01 AM
---Advertisement---

मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने  २ विकेटने विजय मिळवला. याबरोबर त्यांनी आयपीएल २०१८ची अंतिम फेरी गाठली.

या स्पर्धेत चेन्नई आणि हैद्राबाद तीने वेळा आमने-सामने आले आहेत. या तीनही सामन्यात चेन्नईने हैद्राबादला पाणी पाजले आहे. त्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने ४ विकेट्सने, १३मे रोजी झालेल्या सामन्यात ८ विकेट्सने तर काल झालेल्या सामन्यात २ विकेट्सने विजय मिळवला.

यातील १४ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात अंबाती रायडूने ७९ धावा केल्या होत्या. १३मे रोजी झालेल्या सामन्यात त्याने ६२ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या तर काल झालेल्या सामन्यात तो चक्क ० धावेवर  बाद झाला.

आयपीएलमध्ये एकाच हंगामात एकाच संघाविरुद्ध शतकी खेळी करणारा आणि त्याच संघाविरुद्ध ० धावेवर बाद होणारा तो ७वा खेळाडू बनला आहे. यापुर्वी दिग्गज खेळाडू हे असे बाद झाले आहे.

एकाच हंगामात एकाच संघाविरूद्ध ० आणि १०० धावांवर बाद होणारे खेळाडू-

२००९, हैद्राबाद- एबी डीविलियर्स

२०१०, कोलकाता- डेविड वार्नर

२०११, पंजाब- ख्रिस गेल

२०११, बेंगलोर- अॅडम गिलख्रिस्ट

२०१२, दिल्ली- मुरली विजय

२०१६, गुजरात- विराट कोहली

२०१७, हैद्राबाद, अंबाती रायडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment