रविवारी (२४ जुलै) क्रिकेटविश्वातून चकित करणारी बातमी पुढे आली आहे. या दिवशी एका देशाच्या पूर्ण क्रिकेट बोर्डाने राजीनामा दिला आहे. वर्णद्वेषाची काही प्रकरणे पुढे आल्याने क्रिकेट बोर्डाने असे धक्कादायक कृत्य केले असल्याचे पुढे आले आहे. स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाच्या सर्व सदस्यानी एकदाच राजीनामा देण्याचे आश्चर्यकारक पाऊल उचलले आहे. स्वत: स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून याबद्दल माहिती दिली आहे.
स्कॉटलँड क्रिकेट बोर्डाच्या (Scotland Cricket Board) सर्व डायरेक्टर्सनी सीईओंजवळ त्यांचा राजीनामा (Resign Over Racism Cases) दिला आहे. त्यांनी राजीनाम्यात तात्काळ प्रभावामुळे काम बंद करत असल्याचे लिहिले आहे.
गतवर्षी स्कॉटलँडचा गोलंदाज माजिद हक याने आरोप केले होते की, बोर्डातील सदस्यांमध्ये वर्णद्वेष कुटून कुटून भरला आहे. त्याच्या या आरोपानंतर पडताळणी करण्यासाठी या प्रकरणी एक चौकशी समितीही नेमण्यात आली होती. तसेच फक्त माजिद हकनेच नव्हे तर स्कॉटलँडचा माजी क्रिकेटपटू कासिम शेखनेही म्हटले होते की, स्कॉटलँड क्रिकेट बोर्डामध्ये वर्णद्वेषावरून टिप्पणी केल्या जातात. यानंतर आता स्कॉटलँड बोर्डाच्या सर्व डायरेक्टर्सनी राजीनामा देत म्हटले आहे की, स्कॉटलँड संघाकडून क्रिकेट खेळताना कोणालाही वर्णावरून भेदभाव केला गेला असल्याचे जाणवले असेल, तर त्यासाठी आम्ही क्षमा मागतो.
NEWS UPDATE | The Board of Cricket Scotland has resigned. We will work in partnership with @sportscotland with immediate effect to ensure appropriate governance, leadership & support is in place for sport in the days ahead.
Find out more ➡️ https://t.co/S6AF7EyE4A pic.twitter.com/qa2Y0ybcNP
— Cricket Scotland (@CricketScotland) July 24, 2022
क्रिकेटपटूंच्या वाढत्या वर्णद्वेषाबद्दलच्या तक्रारींनंतर एक चौकशी समिती बसवण्यात आली होती, जिच्या अंतर्गत अनेक प्रकरणे पुढे आली, ज्यामध्ये या तक्रारी बरोबर असल्याचे नमूद केले गेले. यानंतर आता स्कॉटलँड बोर्डाच्या डायरेक्टर्सनी राजीनामा देण्याचे पाऊल उचलले आहे. बोर्डाकडून असे विधानही करण्यात आले आहे की, नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाईपर्यंत हे सर्व मुद्दे संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल. जेणेकरून चांगले वातावरण तयार होण्यात मदत होईल.
दरम्यान क्रिकेटविश्वात वर्णद्वेषाची प्रकरणे पुढे येण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्कॉटलँड क्रिकेट बोर्डापूर्वी इंग्लंडमध्ये वर्णद्वेषाची प्रकरणे पाहायला मिळाली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! वाईट काळातून जात असलेल्या साहाला मिळाला बंगाल सरकारचा सर्वोच्च पुरस्कार
पहिल्या वनडेत सुसाट असलेल्या धवनच्या गाडीला दुसऱ्या सामन्यात लागला ब्रेक, रंगली एकच चर्चा