भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही मानाची लढत खेळली जाईल. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅंड याने एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा प्रथमच अंतिम सामना खेळेल. ऑस्ट्रेलियाने या सायकलमध्ये पहिले स्थान पटकावत अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. या संघामध्ये वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅंडला स्थान मिळाले. या सामन्याकडून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्त करताना तो म्हणाला,
“इंग्लंडच्या परिस्थितीमध्ये मी माझ्या कौशल्यांची परीक्षा देण्यासाठी सज्ज आहे. ही जागा खूप वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी केलेला भारताचा दौरा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहिला. तेथील परिस्थिती माझ्या अनुकूल नव्हती. तरीदेखील एकंदरीत कामगिरीवर मी खुश आहे. अशा जागेवर खेळल्याने तुम्ही प्रत्येक वेळी उत्कृष्ट होत जाता.”
बोलॅंडने या सामन्यानंतर होणाऱ्या ऍशेस मालिकेविषयी बोलताना म्हटले,
“इंग्लंडचा संघ मागील काही काळापासून आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर देत आहे. मात्र, या आव्हानासाठी देखील आम्ही तयार आहोत. कारण आम्हाला फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर खेळण्याची सवय आहे.”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तसेच ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वातावरणात ते जोरदार कामगिरी करू शकतात.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी उभय संघ-
ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
(Scott Boland Said I Am Very Keen To Test My Skill In England In WTC Final And Ashes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
मुंबई भारी की चेन्नई? भर रस्त्यात भिडले ब्राव्हो-पोलार्ड, असा लागला निकाल
आनंदाची बातमी: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनीला डिस्चार्ज, ‘इतक्या’ दिवसांत पुन्हा धावू लागणार