विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी काही दिवस उरले आहेत. ह्या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेट प्रेमी वाट पाहत आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. सामन्यात सर्वात जास्त धावा कोण घेणार तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार म्हणून जगभरातले क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्क वितर्क लावत आहे. प्रत्येक दिग्गज आपली वेगवेगळी भविष्यवाणी सांगतो आहे.
भारतीय संघ सध्या विलगीकरणातून बाहेर आला असून मैदानावर सराव करत असल्याचे दिसून आला आहे. तसेच विरोधी संघ न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. ह्या मालिकेचा पहिला सामना अनिर्णित झाला असून दुसरा सामना एजबस्टन येथे होणार आहे. क्रिकेट जाणकार सांगतात की, इंग्लंड सोबत खेळलेल्या कसोटी मालिकेचा फायदा न्यूझीलंड संघाला भारता विरुद्ध कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात नक्कीच होणार.
अंतिम सामन्यात ५५ % फायदा न्यूझीलंड संघाला तर, ४५% भारतीय संघाला होईल असे भारतीय माजी खेळाडू आकाश चोप्रा आणि इरफान पठाण यांनी सांगितले. स्टारस्पोर्टच्या एका कार्यक्रमात चर्चा करताना इरफान आणि न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिस अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा विजय होईल असे म्हटले आहे. स्कॉट स्टायरिसने न्यूझीलंड संघ केवळ सामना जिंकणार नाही तर, संघ किती विकेट्सने जिंकेल याची सुद्धा भविष्यवाणी केली आहे.
स्कॉट स्टायरिस म्हणाला की, ‘आईसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा न्यूझीलंड संघ जिंकेल. इतकेच नाही तर न्यूझीलंड संघ हा सामना ६ गडी राखून जिंकेल आणि न्यूझीलंडचा सलामीवीर डेवोन कॉनवेच्या सर्वात जास्त धावा असतील आणि ट्रेंट बोल्ट सर्वात जास्त गडी बाद करेल.’
इरफान पठाणने सांगितले ‘न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनच्या सर्वाधिक धावा असतील तसेच मोहम्मद शमी आणि ट्रेंट बोल्ट या दोघांमध्ये गोलंदाजीची चुरस असेल’.
महत्त्वाच्या बातम्या –
सुनील छेत्रीने मेस्सीला टाकले मागे; ‘या’ यादीत रोनाल्डोपाठोपाठ मिळवला दुसरा क्रमांक
दुखापतीमुळे गेले २ महिने क्रिकेटपासून दूर असलेला बेन स्टोक्स ‘या’ स्पर्धेतून करणार मैदानात पुनरागमन
WTC च्या अंतिम सामन्यात कोण करणार सर्वाधिक धावा? पाहा काय म्हणाला दिग्गज क्रिकेटपटू