काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल करण्याचे सुचविले होते. यामध्ये पायचीत, स्विच हीट आणि रिव्हर्स स्वीप यांचा समावेश होता. यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. त्याने केलेल्या विधानावर चोहोबाजूंंनी टिका होत होती. त्यातच त्याला आता न्यूझीलंडच्या महान खेळाडूंची साथ मिळाली आहे.
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिस (Scott Styris) यानेही स्विच हीट बाबत मोठे विधान केले आहे. त्याने या शॉटवर बंदी आणावी असे सुचविले आहे. क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू जेव्हा लेग स्टम्पच्या बाहेर जातो तर त्या फलंदाजाला बाद दिले जात नाही. या नियमावर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि स्टायरिस यांनी आक्षेप घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये स्टायरिस म्हणाला, “मी आर अश्विनच्या विधानाशी पुर्णपणे सहमत आहे. त्याने जे काही बदल सुचविले ते अतिशय चांगले आहेत. स्विच हीट शॉट पाहताना दर्शकांना मजा येते, मात्र माझ्यामते या शॉटला बॅन करणे योग्य होईल. जेव्हा संघ क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा त्या संघाच्या कर्णधाराला आणि खेळाडूंना नियमांचे पालन करावे लागते. मग ही बाब फलंदाजांच्या बाबतीत का लागू होत नाही.”
“फलंदाज स्विच हीट, रिव्हर्स स्वीप किवां रिव्हर्स हीट खेळू शकतो, मात्र मला ते आवडत नाही. जर तुम्ही स्वीच हिटवर पूर्णपणे बंदी आणली आणि रिव्हर्स स्वीप किवां रिव्हर्स हीट खेळण्यास परवाणगी दिली तर अश्विनच्या पायचीत नियामाबाबत बदल करण्याची आवश्यकता नाही. असे झाले तर गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी समप्रमाण ठरणार आहे,” असेही स्टायरिसने पुढे म्हटले आहे.
एमसीसीच्या कायद्यानुसार, चेंडू हा पीचवरून लेग स्ट्म्पच्या बाहेर जातो तेव्हा पायचीत बाद दिले जाते.
“फलंदाजांने रीव्हर्स स्वीप खेळावे की नाही, गोलंदाज लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकत असेल याबाबत माझे काही म्हणणे नाही, माझा मुद्दा पायचीतचा आहे,” असे अश्विन म्हणाला होता.
“फलंदाजांनी स्वीचहीट जरूर खेळावे मात्र त्याने शॉट मारण्याची संधी सोडली तर त्याला पायचीत बाद द्यावे. जेव्हा तो फलंदाज शॉट खेळण्यासाठी वळतो तेव्हा तुम्ही त्याला कसे पायचीत बाद देत नाही? हा नियम बदलला तर क्रिकेटच्या सगळ्या प्रकारामध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात होणारा सामना बरोबरीचा ठरणार आहे,” असेही अश्विनने त्याच्या युट्युबच्या चॅनलवर म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतकवीर मुरली विजयच्या पत्नीची रिऍक्शन पाहण्यासारखी, पोस्ट केलेल्या स्टोरी झाल्या व्हायरल
टी२० विश्वचषकात बुमराहला खेळवायचे असले तर ‘हे’ कराच, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा भारताला मोलाचा सल्ला