---Advertisement---

आयपीएल लिलावात मिळाला नाही वाली; पठ्ठ्यानं दुसऱ्या दिवशी ११ चेंडूत ५६ धावा करत फ्रँचायझींना दिले प्रत्युत्तर

On: शनिवार, फेब्रुवारी 20, 2021 3:32 PM
---Advertisement---

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांतिक हॉटेलमध्ये पार पडलेल्या लिलावाने या हंगामाचा श्रीगणेशा झाला. या लिलावात सहभागी झालेल्या २९१ खेळाडूंपैकी अनेकांना कोटींच्या घरात बोली लागल्या.

काही खेळाडू आपल्या आधारभूत किंमतीसह आयपीएलचा भाग बनले. तर काहींना कुणीही खरेदीदार मिळाला नाही. अशाच एका अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने आपल्या दमदार प्रदर्शनासह फ्रँचायझींना जबरदस्त चपराक लगावली आहे. हा खेळाडू अजून कोण नसून, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ‘शॉन एबॉट’ होय.

ऑस्ट्रेलियामध्ये देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट अर्थात शेफिल्ड शिल्डचा थरार चालू आहे. या स्पर्धेतील अकरावा सामना १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत झाला. या सामन्याच्या अखेरच्या दिवशी २८ वर्षीय एबॉटने ७५ चेंडूत ७३ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ६ षटकार आणि ५ चौकार मारले. विशेष बाब म्हणजे, सुरुवातीच्या ११ चेंडूतच चौकार-षटकारांचा पाऊस पाडत त्याने ५६ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे एबॉटने आपल्यावर बोली न लावणाऱ्या आयपीएल फ्रँचायझींना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

एबॉटला आजवर आयपीएलमध्ये खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. मुळात वेगवान गोलंदाज असलेल्या या खेळाडूने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संगाने विकत घेतले होते. परंतु पूर्ण हंगामात त्याला अवघ्या २ सामन्यात संधी देण्यात आली. त्यातही त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात सामील केले नाही.

यंदाही ५० लाखांच्या आधारभूत किंमतीसह एबॉट आयपीएल २०२१च्या लिलावात उतरला होता. मात्र यंदाही त्याला कोणीही वाली मिळाला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

स्पायडरमॅन, स्पायडरमॅन! जिममध्ये रिषभ पंतची मस्ती, पाहा मजेदार व्हिडिओ

अहमदाबाद कसोटीत उमेश यादव खेळणार का नाही? येत्या २ दिवसांत घेतला जाणार निर्णय

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ‘व्वा हनुमा’, आयपीएल लिलावात मात्र ‘ना-ना’!! अनसोल्ड राहिल्यानंतर विहारीने दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---