पुणे (28 मार्च 2024) – आज तिसरा सामना जालना विरुद्ध लातूर या संघा मध्ये झाला. काल झालेल्या लढतीत जालना संघाने सातारा संघाचा पराभव केला होता तर लातूर संघाला धुळे संघाने पराभूत केले होते. जालना संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत संघाला आघाडी मिळवून दिली. जालना कडून रोहित बिन्नीवले ने उत्कृष्ट चढाया करत गुण मिळवले. सामन्याच्या 9 व्या मिनिटाला जालना संघाने लातूर संघाला ऑल आऊट करत 13-04 अशी आघाडी मिळवली.
जालनाच्या रोहित बिन्नीवले व वीरेंद्र मंडलिक यांनी चतुरस्त्र चढाया करत संघाला गुण मिळवून दिले. मध्यंतराला जालना संघाकडे 25-09 अशी निर्यायक आघाडी होती. मध्यंतरा जालना संघाने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत आघाडी वाढवली. रोहित बिन्नीवले ने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत संघाचा विजय सोपा केला. वीरेंद्र मंडलिक ने सुपर टेन पूर्ण करत महत्वपूर्ण भूमिका निभावली.
जालना ने 49-22 अश्या मोठ्या फरकाने लातूर संघाचा पराभव केला. रेलीगेशन फेरीतील जालना संघाने दुसरा विजय मिळवला. जालना संघाकडुन रोहित बिन्नीवले ने अष्टपैलू खेळ करत चढाईत 14 व पकडीत 3 गुण मिळवले. विरेंद्र मंडलिक ने सुपर टेन पूर्ण केला. तर सनी राठोड व ओमराज वखर्डे यांनी पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवले. लातूर कडून प्रदिप आकांगिरे याने अष्टपैलू खेळ करत 10 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- रोहित बिन्नीवले, जालना
बेस्ट डिफेंडर- सनी राठोड, जालना
कबड्डी का कमाल- विरेंद्र मंडलिक, जालना
महत्वाच्या बातम्या –
रेलीगेशन फेरीत रायगड संघाची नांदेड संघावर मात
रेलीगेशन फेरीत धुळे संघाचा सलग दुसरा मोठा विजय