पुणे, 9 ऑक्टोबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत राहुल क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदु जिमखाना या संघांनी आपली विजयी मलिका कायम ठेवत दुसरा विजय मिळवला.
सनराईज क्रिकेट स्कुल व सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सार्थक ढमढेरे(109 धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर राहुल क्रिकेट अकादमी संघाने पीबीकेजेसीए संघावर 126 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पीबीकेजेसीएच्या शौर्य महात्मे(5-41), ध्रुव पराडकर(3-34) यांनी केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना राहुल क्रिकेट अकादमी संघाला 31 षटकात सर्वबाद 204 धावाच करता आल्या. यात सार्थक ढमढेरेने 82चेंडूत 13चौकार व 4 षट्काराच्या मदतीने 109 धावा चोपल्या. त्याला प्रतीक कडलक 29, क्षितिज पिंगळे 22, प्रसाद आंबळे 16 यांनी धावा काढून साथ दिली. याच्या उत्तरात पीबीकेजेसीए संघ 27.3 षटकात सर्वबाद 78 धावावर संपुष्टात आला. यात शौर्य महात्मेने एकाबाजूने लढताना 27 धावा केल्या. राहुल क्रिकेट अकादमीकडून श्रेयश फडतरे(2-8), सुधांशू डफळ(2-5), प्रणित जगताप(2-18), ओम वाइकर(2-20) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामनावीर सार्थक ढमढेरे ठरला.
दुसऱ्या सामन्यात अर्जुन सोनार(3-14) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 22 यार्डस क्रिकेट अकादमी संघाचा 9 गडी राखून पराभव केला. (Second win for Rahul Cricket Academy and PYC Hindu Gymkhana in Third Eye Cricket Championship)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सनराईज स्कूल मैदान:
राहुल क्रिकेट अकादमी: 31 षटकात सर्वबाद 204 धावा(सार्थक ढमढेरे 109(82,13×4,4×6), प्रतीक कडलक 29(19,4×4,1×6), क्षितिज पिंगळे 22, प्रसाद आंबळे 16, शौर्य महात्मे 5-41, ध्रुव पराडकर 3-34) वि.वि.पीबीकेजेसीए: 27.3 षटकात सर्वबाद 78 धावा(शौर्य महात्मे 27, श्रेयश फडतरे 2-8, सुधांशू डफळ 2-5, प्रणित जगताप 2-18, ओम वाइकर 2-20); सामनावीर – सार्थक ढमढेरे; राहुल क्रिकेट अकादमी संघ 126 धावांनी विजयी
सहारा क्रिकेट मैदान:
22 यार्डस क्रिकेट अकादमी: 43.3 षटकात सर्वबाद 100धावा(ऋषभ जोशी 41(76,2×4), पार्थ फडके 17, श्रेयश बिऱ्हाडे 16, अर्जुन सोनार 3-14, असीम देवगावकर 2-24, वीर कारखानीस 2-15, अर्जुन चेपे 1-15) पराभुत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 19.3 षटकात 1 बाद 102धावा(ओंकार साळुंके नाबाद 49(55,5×4), महेश चौधरी नाबाद 24(24,2×4), इशान गुप्ते 20(39), अक्षत लाहोटी 1- 34); सामनावीर- अर्जुन सोनार; पीवायसी हिंदू जिमखाना 9 गडी राखून विजयी.
महत्वाच्या बातम्या –
फिट & फाईन बोल्ट! सीमारेषेजवळ टिपला अविश्वसनीय झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ
पाकिस्तानविरुद्ध भगव्या जर्सीत खेळणार टीम इंडिया? आशिष शेलार म्हणाले…