पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत टेनिस नट्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत टेनिसनट्स संघाने लॉ कॉलेज लायन्स संघाचा 24-07 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून रवी कोठारी, श्रीशहा भट, चनाभाऊ कुमार, दिपक पाटील, जॉय बॅनर्जी, नितीन सावंत, आलोक नायर, अमित किंडो यांनी सुरेख कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात बाबू जाधव, संजय पाटील,अजिंक्य फडतरे, गणेश देवखिले, सुमित सातोस्कर, संजय पाटील यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर फर्ग्युसन कॉलेज ब संघाने एसेस युनायटेड संघाचा 20-16 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
निकाल: साखळी फेरी:
एफसी ब वि.वि.एसेस युनायटेड 20-16(100अधिक गट: बाबू जाधव/संजय पाटील वि.वि.सुनील लुल्ला/बद्री पुनावाला 6-4; 90 अधिक गट: नकुल फिरोदिया/महेंद्र देवकर पराभूत वि.राहुल सिंग/पार्थ मोहापात्रा 2-6; खुला गट: अजिंक्य फडतरे/गणेश देवखिले वि.वि.सुनील लुल्ला/निखिल भगत 6-2; खुला गट: सुमित सातोस्कर/संजय पाटील वि.वि.सचिन झा/प्रफुल नागवानी 6-4);
टेनिसनट्स वि.वि.लॉ कॉलेज लायन्स 24-07(100अधिक गट: रवी कोठारी/श्रीशहा भट वि.वि.केतन जाठर/श्रीकृष्णा पानसे 6-3; 90 अधिक गट: चनाभाऊ कुमार/दिपक पाटील वि.वि.शिवाजी यादव/संतोष जयभाई 6-0; खुला गट: जॉय बॅनर्जी/नितीन सावंत वि.वि.केतन जाठर/राहुल पंढरपुरे 6-4; खुला गट: आलोक नायर/अमित किंडो वि.वि.तारिख पारख/राहुल मंत्री 6-0)
महत्त्वाच्या बातम्या –