सिडनी| सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे 3 सामन्यांची ही टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अफलातून फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. तर दुसऱ्या बाजूने दिनेश कार्तिकही चांगला खेळ करत होता.
यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जे करता आले नाही ते या मैदानावरील सिक्युरीटी गार्डने केले. त्याने कोहलीने मारलेला षटकाराचा झेल घेत सगळ्यांना चकीत केले. या सामन्यात जरी विराटने नाबाद 61 धावा केल्या असल्या तरी त्या गार्डने विराटचा घेतलेला झेल या सामन्याचा लक्षवेधी क्षण ठरला.
गार्डने घेतलेल्या झेलचे प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत अभिनंदन केले. त्याच्याकडे चेंडू आला तो हातातून निसटत होता मात्र त्याने तो कसातरी पकडला.
Secure hands! Virat Kohli's shot was elite, but this security guard's grab gets our Play of the Day!#AUSvIND @bet365_aus pic.twitter.com/eTMXtXwghi
— cricket.com.au (@cricketcomau) November 25, 2018
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारताला 165 धावांचे आव्हान दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने 2 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. तर कार्तिकनेही 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावांची खेळी केली.
यावेळी कोहली आणि कार्तिक या दोघांची जोडी फोडण्यासाठी 16व्या षटकाला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने ग्लेन मॅक्सवेलकडे चेंडू दिला. मॅक्सवेलच्या षटकात कोहलीने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. त्यावेळी तो झेल बाउंड्री लाईनवर उभा असलेल्या सिक्युरीटी गार्डने पकडला.
या सामन्यात कोहलीने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीने भारतीय चाहते चांगलेच खूष झाले. तसेच भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनीही सुरूवात चांगली करताना 67 धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंच (28) आणि डॉर्सी शॉर्टने(33) चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सलामीला 68 धावांची भागीदारीही रचली होती. परंतू हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनीही खास काही केले नाही.
अन्य फलंदाजांपैकी ग्लेन मॅक्सवेल(13), एलेक्स कॅरे(27), ख्रिस लिन(13), मार्कस स्टॉयनीस(25*) आणि नॅथन कुल्टर नाईल(13*) यांनी धावा केल्या.
भारताकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक 36 धावांत 4 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने 19 धावांत 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण
–कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम
–हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील