---Advertisement---

ऑरेंज साईला तर पर्पल कॅप प्रसिध्द कृष्णाच्या नावे: पाहा IPL 2025 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

On: बुधवार, जून 4, 2025 6:45 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून आयपीएल 2025 चे जेतेपद जिंकले. तर पंजाब किंग्ज उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूसह सर्व पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी समोर आली आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला चमकदार ‘टाटा कर्व्ह’ कार मिळाली आहे.

गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 759 धावा केल्याबद्दल ऑरेंज कॅप जिंकली. प्रसिद्ध कृष्णाने 25 विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली. सुदर्शनला स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देखील मिळाला, ज्यासाठी त्याला 10 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली.

सूर्यकुमार यादवला मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. सूर्याने स्पर्धेत 717 धावा केल्या आणि या पुरस्कारासाठी त्याला 10 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली. तर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा हंगामाचा सुपर स्ट्रायकर होता. सूर्यवंशीने 7 सामन्यात 206.55 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 252 धावा केल्या. सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये सर्वोत्तम स्ट्राइक रेटने खेळला. एसआरएचच्या कामिंदू मेंडिसला हंगामातील सर्वोत्तम कॅचचा पुरस्कार मिळाला.

आयपीएल 2025मधील पुरस्कार विजेते

स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू – साई सुदर्शन (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन – वैभव सूर्यवंशी (टाटा कर्व्ह कार आणि ट्रॉफी)
सुपर सिक्सेस ऑफ द सीझन – निकोलस पूरन (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
रुपे गो ऑफ द फोर सीझन – साई सुदर्शन (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन पुरस्कार – मोहम्मद सिराज (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
कॅच ऑफ द सीझन – कामिंदू मेंडिस (१० लाख रुपये आणि ट्रॉफी)
फेअर प्ले पुरस्कार – चेन्नई सुपर किंग्ज (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
पर्पल कॅप – प्रसिद्ध कृष्णा (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
ऑरेंज कॅप – साई सुदर्शन (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
सर्वात मौल्यवान खेळाडू – सूर्यकुमार यादव (10 लाख रुपये आणि ट्रॉफी)
उपविजेता संघ – पंजाब किंग्ज (12 कोटी रुपये आणि शिल्ड)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---