पुणे। पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत श्रावी देवरे, वेदांत जोशी, अवनीश चाफळे, अर्चित धूत, निव कोठारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी 8 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रावी देवरे हिने अव्वल मानांकित सान्वी राजूचा 5-2 असा सहज पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. मुलांच्या गटात वेदांत जोशी याने सहाव्या मानांकित युगंधर शास्त्रीवर 5-2 असा विजय मिळवला.
12वर्षाखालील मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित अवनीश चाफळेने सहाव्या मानांकित अमोघ दामलेचा 6-3 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पंधराव्या मानांकित अर्चित धूत याने आठव्या मानांकित ध्रुव लागडेला 6-2 असे पराभूत केले. अथर्व येलभर याने राजवीर पाडाळेचा टायब्रेकमध्ये 6-5(6) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बिगरमानांकीत तेज ओकने सोळाव्या मानांकित शिवम पाडियाला 6-1 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
8 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
श्रावी देवरे वि.वि.सान्वी राजू (1) 5-2;
अवंतिका सैनी वि.वि.समिका कांबळे 5-1;
स्वरा जावळे पुढे चाल वि.ओवी मारणे;
श्रुष्टि सूर्यवंशी(2) वि.वि.नमिता देशमुख 5-0;
8 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
अंशुल पुजारी(1)वि.वि.अथर्व बनसोडे 5-2;
वेदांत जोशी वि.वि.युगंधर शास्त्री(6) 5-2;
अचिंत्य कुमार(8)वि.वि.नील बोन्द्रे 5-3;
क्रिशय तावडे(2) पुढे चाल वि.स्वराज भोसले;
12वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
अभिराम निलाखे(1)वि.वि.अथर्व जोशी6-1;
अथर्व येलभर वि.वि.राजवीर पाडाळे 6-5(6);
तेज ओक वि.वि.शिवम पाडिया(16) 6-1;
अवनीश चाफळे(9) वि.वि.अमोघ दामले(6) 6-3;
अर्चित धूत(15)वि.वि.ध्रुव लागडे(8) 6-2;
निव कोठारी वि.वि.पार्थ काळे(14) 6-4;
अर्णव बनसोडे(5) वि.वि.शिवांश कुमार(10)6-2;
अद्विक नाटेकर(2) वि.वि.वेदांत चव्हाण 6-0;
12 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
सलोनी परिदा(1) वि.वि.अनन्या देशमुख 6-1;
वैष्णवी सिंग वि.वि.अंजली निंबाळकर 6-2;
अनुष्का वि.वि.दुर्गा बिराजदार 6-1;
श्रावणी देशमुख वि.वि.देवांश्री प्रभुदेसाई 6-3.