पुणे। डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 20व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या एकतेरिना रेनगोल्ड, जपानच्या मोयुका उचिजिमा, उझबेकिस्तानच्या नायजीना अब्दुरैमोव्हा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या एकतेरिना रेनगोल्ड हिने अव्वल मानांकित बोस्निया आणि हर्जेगोविनाच्या नेफिसा बर्बेरोविचचा 6-4, 2-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. हा सामना तास मिनिटे चालला. जपानच्या बिगरमानांकीत मोयुका उचिजिमा हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित जपानच्या चिहिरो मुरामत्सुचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
मोयुकाने चिहीरोचे आव्हान तास मिनिटात मोडीत काढले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपापल्या सर्व्हिस राखल्या. पण त्यानंतर मोयुकाने आक्रमक व नेटजवळून खेळ करत पाचव्या गेममध्ये चिहीरोची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या चिहीरोला अखेरपर्यंत सूर गवसलाच नाही. दुसऱ्या सेटमध्येदेखील मोयुकाने आपले वर्चस्व राखत पहिल्या व तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात आघाडी घेतली. मोयुकाच्या बिनतोड सर्व्हिस व आक्रमक खेळापुढे चिहीरोची खेळी निष्प्रभ ठरली व हा सेट 6-0 असा एकतर्फी जिंकून विजय मिळवला. रशियाच्या एकतेरिना रेनगोल्ड व जपानच्या मोयुका उचिजिमा या दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत दोनवेळा मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवला.
पाचव्या मानांकित उझबेकिस्तानच्या नायजीना अब्दुरैमोव्हा हिने कझाकस्तानच्या दुसऱ्या मानांकित ऍना डैनिलिनाचा 6-1, 2-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आणखी एका सनसनाटी निकालाची नोंद केली. लात्वियाच्या चौथ्या मानांकित डायना मार्सिंकेविका हिने युक्रेनच्या आठव्या मानांकित वेलेरिया स्त्राकोवाचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(2) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ऋतुजा भोसलेने जपानच्या हिरोको कुवाटा च्या साथीत सौजन्या बाविसेट्टी व डायना मार्सिन्केविका यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. कझाकस्तानच्या झिबेक कुलंबायेवा व रशियाच्या एकतेरिना याशिना यांनी भारताच्या जेनिफर लुइखम व मिहिका यादव या जोडीचा 6-1, 4-6, [10-6] असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपुर्व फेरी: महिला एकेरी:
एकतेरिना रेनगोल्ड (रशिया)वि.वि.नेफिसा बर्बेरोविच (बोस्निया आणि हर्जेगोविना) [1] 6-4, 2-6, 6-4;
डायना मार्सिंकेविका (लातविया) [4] वि.वि.वेलेरिया स्ट्राखोवा (युक्रेन) [8] 7-5, 7-6(2);
नायजीना अब्दुरैमोव्हा (उझबेकीस्तान) [5] वि.वि.ऍना डैनिलिना (कझाकस्तान) [2] 6-1, 2-6, 6-4;
मोयुका उचिजिमा (जपान) वि.वि. चिहिरो मुरामत्सु (जपान) [3] 6-2, 6-0;
दुहेरी गट: उपांत्यपुर्व फेरी:
झिबेक कुलंबायेवा (कझाकस्तान) [2] /एकटेरिना याशिना (रशिया)वि.वि.जेनिफर लुइखम (भारत)/ मिहिका यादव (भारत) 6-1, 4-6, [10-6]
ऋतुजा भोसले (भारत) / हिरोको कुवाटा (जपान) [4] वि.वि.सौजन्या बाविसेट्टी (भारत) / डायना मार्सिन्केविका (लातविया) 6-0, 6-1;
ऍना डॅनिलिना (कझाकस्तान) /व्हॅलेरिया स्ट्राखोव्हा (युक्रेन) [1]वि. साथ्विका सम (भारत) /सौम्या विग (भारत)6-4, 6-3
फुना कोजाकी (जपान) /मिसाकी मात्सुदा (जपान) वि अकिको ओमाए (जपान) [3] /मोयुका उचिजिमा (जपान) 1-6, 6-4(10-5)
महत्त्वाच्या बातम्या –