---Advertisement---

जगातील सर्वात फिट क्रिकेटर विराट कोहलीला ही व्यक्ती म्हणतेय कमजोर

On: शुक्रवार, जुलै 24, 2020 8:06 PM
---Advertisement---

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक फलंदाजी तसेच फिटनेससाठीही परिचित आहे. कोहलीचा फिटनेस पाहून बाकीचे खेळाडू देखील खूप प्रेरित झाले. तो परफॉर्मन्स सोबत तंदुरुस्तीचीही चांगली काळजी घेतो. पण कोहलीच्या आईला वाटतं की आपला मुलगा कमजोर आहे. ही माहिती खुद्द क्रिकेटरने एका चॅट शो दरम्यान दिली होती.

‘ओपन नेट्स विथ मयंक’ शो दरम्यान मयंक, कोहलीला  विचारतो की तुझे आईशी असे काही संभाषण आहे का ज्यामुळे तुम्हाला हसू येईल. यावर कोहली म्हणतो की, “माझी आई म्हणतेय की मी कमजोर होत आहे. ही सामान्य बाब आहे. मी आजारी नाही हे त्यांना पटवून द्यावं लागते. मी हे चांगले खेळण्यासाठी करत आहे.”

कोहली पुढे म्हणाला की, ” कधीकधी मी अस्वस्थ होतो आणि माझ्यासाठी हे का महत्वाचे आहे. हे आईला सांगणे कठीण होते.  दिवसभर मी मेहनत करतो आणि दुसऱ्या दिवशी मी आजारी असल्यासारखं वाटतय हे ऐकावे लागते. ”

कोहली सराव करण्यासाठी मैदानात उतरला नाही आणि कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू असल्याने तो घरी राहिला आहे. घरी राहूनच तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करतोय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---