सध्या क्रिकेटजगतात लिजेंड्स लीग क्रिकेटची चर्चा आहे. स्पर्धेचा दुसरा हंगाम यावर्षी भारतात खेळला जाईल. सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत जगभरातील निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतात. यापूर्वीच अनेक माजी खेळाडूंनी आपण स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर, आता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चार पैकी दोन संघांच्या कर्णधारांची घोषणा झाली आहे.
मागील वर्षी या स्पर्धेत तीन संघ खेळले होते. यामध्ये इंडिया महाराजा, एशिया लायन्स व वर्ल्ड जायंट्स यांचा समावेश होता. यात वर्ल्ड जायंट्सने विजेतेपद पटकावलेले. स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात चार संघ खेळणार असून, ११० माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होण्याची शक्यता आहे.
आता या स्पर्धेत उतरणाऱ्या गुजरात जायंट्स व इंडिया कॅपिटल्स या संघांनी आपल्या कर्णधारांची नावे जाहीर केली. अदानी स्पोर्ट्सलाईनची मालकी असलेल्या गुजरातने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्याकडे नेतृत्वाची धुरा दिली आहे. तर, जीएमआर ग्रुपने इंडिया कॅपिटल सी आपल्या संघाचे नेतृत्व अनेक वर्ष सेहवागसोबत भारतासाठी सलामी दिलेल्या गौतम गंभीर याच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे आता या दोन मित्रांमधील लढत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतील. इतर दोन संघांच्या नावाची व कर्णधारांची लवकरच घोषणा केली प्रत्येक संघ ड्राफ्ट पद्धतीने आपापले पथक पूर्ण करेल.
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील अनेक दिग्गज या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारताकडून हरभजन सिंग, पठाण बंधू या नामांकित खेळाडूंनी खेळण्याचे जाहीर केले आहे. आशिया संघासाठी यावेळी मुथय्या मुरलीधरन, मिसबाह उल हक, थिसारा परेरा हे खेळताना दिसतील. इतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये नुकताच निवृत्त झालेला इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन, दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन यांसह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची खिलाडूवृत्ती! हॉंगकॉंगच्या संघाला केले ड्रेसिंग रूममध्ये आमंत्रित; पाहा खास छायाचित्रे
बहुप्रतिक्षित अर्धशतकासह विराटने मागे टाकला ‘गुरू’ द्रविड! सचिनपर्यंत पोहोचण्यासाठी करणार प्रयत्नांची शर्थ