---Advertisement---

‘… म्हणून टीम इंडिया विश्वचषकात चारते पाकिस्तानला धूळ’; सेहवागचा मोठा खुलासा

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 5:43 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात पारंपारिक विरोधी म्हणून भारत आणि पाकिस्तानकडे पाहिले जाते. उभय संघांमध्ये सर्व सामने हे अटीतटीचे तसेच अत्यंत निकराचे झालेले पाहायला मिळतात. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दोन्ही देशांचे क्रिकेटप्रेमी देखील या सामन्यासाठी खूप उत्साह येत असलेले दिसून येतात. युएई येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व देशातील चाहते तयार झाले असून, भारत आणि पाकिस्तान या सामन्यासाठी वातावरणनिर्मिती सुरू आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारत विश्वचषकात पाकिस्तानला नेहमी का हरवतो? यामागील कारणांचा खुलासा केला.

भारताच्या विजयाचे कारण
भारत आणि पाकिस्तानमधील दोन वृत्तवाहिन्यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग व भारताला १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे विश्वविजेते कर्णधार कपिल देव हे सहभागी झाले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान विश्वचषकात होणार्या सामन्याविषयी बोलताना सेहवाग म्हणाला,
“मी २००३ व २०११ विश्वचषकाची गोष्ट सांगू इच्छितो. आपण पाकिस्तानवर नेहमी विजय मिळवतो कारण, आम्ही दबाव घेत नाही. आपला संघ अधिक चांगल्या स्थितीत असल्यावर खेळाडूंवर दबाव नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या कोणत्याही खेळाडूकडून कोणतेही मोठे प्रसिद्धीसाठीचे विधान येत नाही. आपली तयारी उत्तम असल्यावर जिंकण्याचा विश्वास असतो आणि ते मैदानात दिसते.”
या कार्यक्रमात पाकिस्तानच्या एका सूत्रसंचालकाने आम्ही यावेळी इतिहास बदलू असे वक्तव्य केल्यानंतर सेहवागने हे उत्तर दिले होते.

विश्वचषकात भारताचा वरचष्मा
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान टी२० विश्वचषकात पाच सामने झाले असून ते सर्व सामने भारताने जिंकले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी होणारा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना जिंकून भारत विजय सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ विश्वचषक इतिहासात प्रथमच भारतीय संघाला मात देण्याच्या प्रयत्न असेल. भारताच्या गटात न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांचा समावेश असून, पात्रता फेरीतील आणखी दोन संघ गटात सहभागी होतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---