---Advertisement---

सेहवाग म्हणतो भारताच्या ‘या’ खेळाडूमध्ये दिसते युवा कायरन पोलार्डची झलक

On: शनिवार, मे 15, 2021 11:54 PM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम अचानकपणे स्थगित करण्यात आला. स्पर्धेदरम्यान विविध संघांचे खेळाडू आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने २९ सामन्यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी थांबवली गेली. मात्र, स्पर्धेदरम्यान अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळवली. त्याचवेळी, भारतीय संघाचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने पंजाब किंग्सचा फलंदाज शाहरुख खान याचे खास शब्दात कौतुक केले.

सेहवागने केले शाहरुखचे कौतुक
भारतीय संघाचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग अनेकदा नवीन खेळाडूंचे कौतुक करताना दिसून येतो. त्याने नुकतेच आयपीएल २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा पंजाब किंग्सचा फलंदाज शाहरुख खानचे गुणगान गायले.

सेहवाग म्हणाला, “या आयपीएल हंगामात मला शाहरुख खानने खूप प्रभावित केले. मला त्याच्यामध्ये युवा कायरन पोलार्डची झलक दिसते. तोदेखील नवखा असताना अशी फलंदाजी करायचा. मला पक्का विश्वास आहे की, त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाल्यास तो नक्की शतक झळकावेल.”

प्रथमच आयपीएल खेळत असलेल्या शाहरुखला सर्व सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. संघासाठी फिनिशर ही भूमिका बजावताना त्याने नाबाद ६, ४७, नाबाद १५, २२, १३, ० व ४ अशा धावा बनविल्या.

आयपीएल लिलावात मिळाली होती मोठी रक्कम
तमिळनाडूसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर शाहरुख खानला आयपीएल लिलावात पंजाब किंग्सने तब्बल ५ कोटी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पंजाब किंग्सचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीदेखील शाहरूखमध्ये पोलार्ड सारखी गुणवत्ता आहे असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

“शोएब अख्तरने मला धमकी दिलेली”, रॉबिन उथप्पाने केला खळबळजनक दावा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात उडाली खळबळ! बॉल टेम्परिंग प्रकरणाची होऊ शकते पुन्हा चौकशी

“करारबद्ध खेळाडू असताना बीसीसीआयने वेदाशी कोणताही संपर्क साधलेला नाही”, लिसा स्थळेकरने फटकारले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---