इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अत्यंत खराब कामगिरीबद्दल किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने लक्ष्य केले होते. सेहवागने त्याला 10 कोटींची चीअरलीडर असे म्हटले होते. सेहवागने केलेल्या टिप्पणीला आता ग्लेन मॅक्सवेलने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मॅक्सवेल म्हणाला की, सेहवाग माध्यमात चर्चेत राहण्यासाठी अशा टिप्पण्या करतो. तसेच तो पुढे म्हणाला की, सेहवागला मी अजिबात आवडत नाही हे मला ठाऊक आहे.
सेहवागला मॅक्सवेलचे उत्तर
ग्लेन मॅक्सवेल वीरेंद्र सेहवागच्या टिप्पणीवर म्हणाला की, “मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. सेहवागने हे प्रथमच केले नाही. त्याने पंजाबचा सल्लागार असतानाही असे बोलले होते.” मॅक्सवेल पुढे म्हणाला, “हरकत नाही. वीरूला मी आवडत नसेल आणि त्याबद्दल ते खूप बोलतात. त्यांना जे आवडेल ते ते करू शकतात. अशा विधानांमुळे ते माध्यमात चर्चेत राहतात. मी अशा गोष्टी हाताळतच पुढे जात आहे.”
सेहवागचे वक्तव्य
वीरेंद्र सेहवागने फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटींची चिअरलीडर आणि कामचुकार म्हटले आहे. सेहवागने मॅक्सवेलसाठी म्हटले होते की, “ही 10 कोटींची चीअरलीडर पंजाबसाठी खूप भारी पडली. गेल्या काही हंगामात मॅक्सवेलचा विक्रम कामचुकारपणा करण्याचा होता आणि या हंगामात त्याने त्याचा विक्रमही मोडला आहे.”
आयपीएल 2020 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने अतिशय खराब प्रदर्शन केले. त्याने 13 सामन्यांत 15.42 च्या सरासरीने फक्त 108 धावा केल्या. संपूर्ण हंगामात त्याला एकही षटकार मारता आला नाही. मात्र, आता ग्लेन मॅक्सवेल भारतीय संघाविरुद्ध आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर मॅक्सवेलची बॅट धावांचा पाऊस पाडते.
महत्त्वाच्या बातम्या-
विरेंद्र सेहवागने तयार केला सर्वोत्तम आयपीएल संघ, विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा…
कोई शक ! विरेंद्र सेहवागने केले अनोख्या अंदाजात मुंबई इंडियन्सचे कौतुक
‘दिल्ली कॅपिटल्स माझ्या नि:शुल्क सल्ल्याचा फायदा घेत आहे’, अंतिम सामन्याआधी सेहवागची प्रतिक्रिया