संपूर्ण जग कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे. जवळपास दीडवर्षापासून या विषाणूमुळे लोकांच्या आयुष्यात अशांतता निर्माण झाली आहे. काही काळ देशात त्याची गती थोडी कमी झाली होती, पण आता दुसऱ्या लाटेमध्ये नवीन नवीन प्रकरणे समोर आल्याचे दिसून आले आहे. कोरोना विषाणूमुळे सगळीकडे जग थांबलेले असताना डॉक्टर मात्र त्यांच्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताना दिसून येत आहेत.
देशातील काही राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. लॉकडाउन संपूर्ण देशात लावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असताना डॉक्टर लोकांच्या उपचारांसाठी दिवसरात्र काम करत आहेत. सध्या गर्भवती महिला डॉक्टरचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबद्दल माजी भारतीय सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही डॉक्टरांचे कौतुक केले आहे.
सेहवागने सोशल मीडिया अकाऊंटवरून एका गर्भवती महिला डॉक्टरांचे छायाचित्र शेअर केले आहे. त्या छायाचित्रातील महिला सात महिन्यांची गर्भवती महिला असून रुग्णांवर उपचार करत असल्याचे म्हटले आहे. सेहवाग पुढे ट्विटमध्ये म्हणतो की, रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी निःस्वार्थपणे सेवा केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बोलायला शब्द अपुरे पडत आहेत.
No words to express gratitude to the health workers who are selflessly trying to save lives.
Request everyone to please wear masks and maintain social distancing and not venture out needlessly 🙏🏼 pic.twitter.com/zXs7hqqXfK— Virender Sehwag (@virendersehwag) April 17, 2021
सेहवागने हे ट्विट करताना म्हटले आहे की,कोरोनाच्या वाढत्या लाटेमुळे आपण सर्वानी काळजी घ्यायला हवीय. त्याने यावेळी सर्वाना दोन्ही हात जोडून मास्क घालण्याचे सर्वाना आवाहन केले आहे. सर्वानी अंतर ठेवून विना कारणाने बाहेर पडायला प्रतिबंध करावा असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आथिया शेट्टीपूर्वी ‘या’ अभिनेत्रींसोबतही जोडले गेले होते केएल राहुलचे नाव
हैदराबाद संघात केदार जाधवला स्थान देण्याची ‘या’ माजी खेळाडूने केली मागणी