---Advertisement---

‘कोहलीपेक्षा सचिनने ट्राॅफीची जास्त वाट पाहिली….’, सेहवागचं वक्तव्य व्हायरल!

On: शुक्रवार, जून 6, 2025 8:56 AM
---Advertisement---

विराट कोहलीच्या मनात एक खदखद होती की त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकले नाही. 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, 3 जूनच्या रात्री विराट कोहलीची ही खदखद पूर्ण झाली, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव करून जेतेपद जिंकले. या विजयानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे की विराट कोहलीने ट्रॉफीसाठी फक्त 18 वर्षे वाट पाहिली, परंतु सचिन तेंडुलकरने तर जास्त वाट पाहयली आहे. 1989 मध्ये पदार्पण केल्यानंतर सचिनने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

वीरेंद्र सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला, “त्याला (कोहलीला) ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त 18 वर्षे वाट पाहावी लागली. सचिन तेंडुलकरने 1989 ते 2011 पर्यंत (विश्वचषक जिंकण्यासाठी) वाट पाहिली. त्यामुळे कोहलीला कमी वाट पाहावी लागली पण तरीही सचिनने कधीही आशा सोडली नाही. त्याने मनाशी ठरवले होते की तो फक्त विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊनच मैदान सोडेल.” सेहवाग म्हणाला की आता जेव्हा जेव्हा कोहली निवृत्तीचा निर्णय घेईल तेव्हा त्याला दिलासा मिळेल आणि तो कोणत्याही पश्चात्तापाशिवाय निवृत्त होऊ शकतो.

माजी सलामीवीर पुढे म्हणाला, “विराट कोहलीसाठीही हेच आहे. आता तो निश्चिंत राहू शकतो. त्याला जेव्हाही वाटेल तेव्हा तो आयपीएल खेळणे थांबवू शकतो आणि निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो. खेळाडू ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळतो. पैसा येतो आणि जातो, पण ट्रॉफी जिंकणे सोपे नसते. कोहलने संघाच्या मोहिमेत खूप मोठे योगदान दिले आहे.”

विराट कोहलीने या हंगामात आरसीबीसाठी 15 सामन्यांमध्ये 657 धावा केल्या. या हंगामात तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आपली मोहीम संपवली. त्याचा स्ट्राइक रेट 144.71 होता, ज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---