विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानचा प्रवास जवळपास संपला आहे. त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणे आता अशक्य आहे. शेवटच्या चारमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना इंग्लंडला शेवटच्या सामन्यात किमान 287 धावांनी पराभूत करावे लागेल किंवा धावांचा पाठलाग करताना 3.4 षटकात लक्ष्य गाठावे लागेल. या परिस्थिती हे अशक्य वाटत आहे. त्यामुळे अशा स्थितीत पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे.
पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का गुरुवारी (9 नोव्हेंबर) रात्री बसला, जेव्हा न्यूझीलंडने श्रीलंकेचा दणदणीत पराभव दिला. जर न्यूझीलंडने मोठा विजय नोंदवला नसता, तर पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी काही आशा उरल्या असत्या, परंतु आता स्पर्धेतील त्यांचा पुढील प्रवास अशक्य झाला आहे.
काल रात्रीपासून भारतीय क्रिकेट चाहते पाकिस्तानच्या या अवस्थेचा आनंद घेत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघावर अनेक मीम्स बनवले जात आहेत. काही वापरकर्ते लिहित आहेत की पाकिस्तान कराची विमानतळासाठी पात्र ठरला आहे, तर कोणी पाकिस्तानी खेळाडूंना पीठ देऊन मायदेशी परतताना दाखवले आहे. परंतु चर्चा आहे ती भारताचा विस्फोटक माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्या ट्टिटची त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने पाकिस्तान झिंदाबाद ऐवजी ‘पाकिस्तान जिंदा भाग’ असे लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे.
Pakistan Zindabhaag!
Have a safe flight back home . pic.twitter.com/7QKbLTE5NY— Virender Sehwag (@virendersehwag) November 10, 2023
म्हत्वाच्या बातम्या
वर्ल्डकप सुरू असतानाच 2 दिग्गजांना पछाडत ‘या’ खेळाडूने जिंकला ICCचा मोठा पुरस्कार, तो नशीबवाण कोण?
रचिन रवींद्रचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा 27 वर्ष जुना विश्वचषक विक्रम काढला मोडीत