---Advertisement---

लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दिसणार सेहवाग, भज्जीसहित ‘या’ दिग्गजांचा जलवा; पाहा संपूर्ण संघ

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 4:38 PM
Harbhajan Singh, Virender Sehwag
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा असते की, त्याला पुन्हा एकदा तरी आपल्या आदर्श असलेल्या माजी क्रिकेटपटूला खेळताना पाहायला मिळावे. लवकरच चाहत्यांचे ही इच्छा पूर्ण होणार असून भारताचे दिग्गज खेळाडू एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग असे अनेक माजी खेळाडू आहेत, जे ओमानमध्ये २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मध्ये इंडिया महाराजा संघाकडून खेळणार आहेत.

एलएलसी ही निवृत्त क्रिकेटपटूंसाठी एक व्यावसायिक लीग आहे, ज्यामध्ये तीन संघ सहभागी होतील. इतर दोन संघ आशिया आणि उर्वरित जगाचे आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे या लीगचे आयुक्त आहेत.

भारताचे कोणते दिग्गज खेळताना दिसतील?
सेहवाग, युवराज आणि हरभजन व्यतिरिक्त, इंडिया महाराजा संघात इरफान पठाण, युसूफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी यांचा समावेश आहे. .

इतर देशाचे दिग्गज खेळाडूही खेळतील
आशिया लायन्स नावाच्या आशियाई संघात पाकिस्तान आणि श्रीलंकेचे माजी दिग्गज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चामिंडा वास, रोमेश कलुवितरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, सनथ जयसूर्या, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ आणि उमर गुल सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणही आशियाई संघाचा भाग असेल. तर तिसऱ्या संघातील खेळाडूंची घोषणा अद्याप झालेली नाही.

हेही वाचा- रवींद्र जडेजाच्या आयुष्यात नव्या मित्राचे आगमन, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती 

लिजेंड्स क्रिकेट लीगचे आयुक्त रवी शास्त्री काय म्हणाले?
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे लिजेंड्स क्रिकेट लीगचे आयुक्त आहेत. ते म्हणाले की, “हे अव्वल दर्जाचे क्रिकेट रोमांचक असेल. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील आशियाई दिग्गज अशा संघात एकत्र आहेत, जे निश्चितपणे इतर दोन संघांना कडवी टक्कर देईल. तो मोठा धमाका असेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

रवींद्र जडेजाच्या आयुष्यात नव्या मित्राचे आगमन, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

न्यूझीलंडला मायभूमीत पराभवाचा धक्का देत बांगलादेश संघाचे धांसू सेलिब्रेशन, ‘हे’ गाणे गात जिंकले मन

सतरा वर्षांपूर्वी सचिनने खेळलेली २४१ धावांची मॅरेथॉन इनिंग; द्विशतकादरम्यान मारला नव्हता कव्हर ड्राईव्ह, जाणून घ्या कारण

हेही पाहा-

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज | 5 Memorable Last Overs

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---