पुणे| सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या खेळाडूंनी ३९वी वरिष्ठ आणि २३वी खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व राखले.
रोइंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आणि आर्मी रोइंग नोड व महाराष्ट्र रोइंग असोसिशनच्या सहयोगाने पुण्यात ही स्पर्धा झाली. पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी महापौर माई ढोरे,आयुक्त राजेश पाटील,उपमहापौर उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, क्रीड़ा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर, सचिव संजय वळवी, उपाध्यक्ष नरेन कोठारी आदी उपस्थित होते. विकल सारवे यांनी महाराष्ट्र संघाचे कोच म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेतील २ हजार मीटरच्या शर्यतीत सर्व्हिसेसच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, दोन रौप्यसह एकूण पाच पदकांची कमाई केली. सर्व्हिसेसने १९ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदही मिळवले. आर्मी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड दोन सुवर्ण, पाच रौप्यपदकांसह दुसऱ्या, तर ओडिसा संघ दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महाराष्ट्राच्या संघाने तीन ब्राँझपदकांची कमाई करून आठवे स्थान पटकावले. मध्यप्रदेश, हरियाणा, चंडिगड, केरळच्या खेळाडूंनीही प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवले.
स्पर्धेतील ५०० मीटर शर्यतीतही सर्व्हिसेसच्याच खेळाडूंनी बाजी मारली. सर्व्हिसेसने तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई करून पदक तक्त्यात अव्वल स्थान पटकावले. ओडिसा संघाने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझपदकांसह दुसरे स्थान पटकावले. आर्मीला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्राँझपदकासह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात महाराष्ट्राला एकही पदक मिळाले नाही.
निकाल –
५०० मीटर – महिला एकेरी सिंगल स्कल्स – नवनीत कौर (२ मि. ०.२८ से., पंजाब), खुसप्रीत कौर(२ मि. ०२.७२ से., मध्य प्रदेश), संजुक्ता डुंग (२ मि. ०३.१९ से., ओडिसा).
पुरुष दुहेरी सिंगल स्कल्स – अरविंदरसिंग – सुनील अत्री (१ मि. ३५.४८ से., आर्मी), सुखदेवसिंग रावत – राहुल (१ मि. ३६.६३ से., मध्य प्रदेश), जसप्रीतसिंग – भगवान सिंग (१ मि. ३७.१४ से., पंजाब).
पुरुष एकेरी सिंगल स्कल्स – परमिंदरसिंग (१ मि. ४०.६० से., हरियाणा), अरविंदसिंग (१ मि. ४२.५१ से., सर्व्हिसेस), बिट्टूसिंग (१ मि. ४४.३९ से., आर्मी).
महिला दुहेरी सिंगल स्कल्स – अविनाश कौर – पूजा (१ मि. ५२.२९ से., हरियाणा), हरनूर सिधू – रेष्माकुमारी मिन्झ (१ मि. ५५.१५ से., ओडिसा), बी. हेमलता – जी. गीतांजली (१ मि. ५५.६१ से., तेलंगण).