भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे, भारतीय संघ पुढील काही महिन्यांत आयर्लंडच्या दौऱ्यावर असेल. जिथे दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध तीन वनडे मालिका खेळायच्या आहेत. भारतीय संघाच्या या दौऱ्यात अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील. ज्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
या दौऱ्यावर भारतीय संघाला संधी देण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना सध्या विश्रांतीची संधी मिळत नाहीये. तर अनेक खेळाडू दुखापतींमुळे संघाबाहेर पडत आहेत. यामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी यावर्षी प्रथमच आयपीएल 2023 (India Premier League 2023) मध्ये पाऊल ठेवले आहे. दुसरीकडे या दौऱ्यामध्ये संजू सॅमसनकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.
बीसीसीआय आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाकडून खेळण्यासाठी अनेक नवीन खेळाडूंना संधी देऊ शकते. बीसीसीआय या दौऱ्यावर 10 नवीन खेळाडूंना संधी देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवागचा पुतण्या मयंक डागरसारखे (Mayank Dagar) खेळाडू असू शकतात. तसेच, या 10 खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिल (Shubman Gill) येऊ शकतात. यासह तो मधल्या फळीत भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसेल.
रिंकू सिंग आणि अर्जुन तेंडुलकरला मिळू शकते संधी
आयर्लंडच्या या मालिकेमध्ये भारतीय संघात 10 नवीन खेळाडू खेळताना दिसतील. ज्यामध्ये रिंकू सिंग आणि अर्जुन तेंडुलकरचे नाव आहे. ही मालिका 19 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. ज्यामध्ये इंडियन प्रीमियर लीगमधील कामगिरीच्या आधारे निवडकर्ते 15 सदस्यीय संघाची घोषणा करू शकतात. यामध्ये तरुण चेहरे पाहायला मिळतील.
या मालिकेत संजू सॅमसन संघाचे नेतृत्व करेल, तर रिंकू आणि अर्जुनसारखे खेळाडू मधल्या फळीमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीने भारतीय संघाला मजबूत करू शकतात. रिंकूने अनेकवेळा आयपीएलमध्ये आपल्या बॅटने संघाच्या फिनिशरची भूमिका केली आहे. दुसरीकडे, आकाश मधवालही मुंबईकडून आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजीत संघाला विकेट मिळवून देऊ शकतो.
आयर्लंडसाठी संभाव्य भारतीय संघ
संजू सॅमसन (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, टिळक वर्मा, मयंक डागर, सुयश शर्मा, रवी बिश्नोई, अर्जुन तेंडुलकर, यश ठाकूर, आकाश मधवाल आणि अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…