---Advertisement---

चक्क ७ वर्षांचा चिमुकला मेलबर्न कसोटीत असणार आॅस्ट्रेलियाचा कर्णधार

---Advertisement---

मेलबर्न। 26 डिसेंबरपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनसह 7 वर्षीय आर्ची शिलर हा देखील आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

याची घोषणा शनिवारी(22 डि सेंबर) यारा पार्क येथे बुपा फॅमेली डे(BUPA Family Day) या कार्यक्रमात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शनिवारी आर्चीचा 7 वा वाढदिवस होता. त्याला त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे. 

लेग स्पिनर असलेला आर्ची नॅथन लायनसह गोलंदाजी करेल. त्याचा आॅस्ट्रेलिया संघातील समावेश अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्याआधी करण्यात आला होता.  आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी आॅस्ट्रेलियाच्या संघात समावेश केला आहे.

आर्चीच्या वडिलांनी जेव्हा त्याला विचारले की त्याला काय करायचे आहे, तेव्हा त्याने आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व करायची इच्छा असल्याचे सांगितले आहे.

आर्चीबद्दल आॅस्ट्रेलियाचा कर्णधार पेन म्हणाला, ‘त्याच्यासारखे कोणीतरी आसपास असेल तर आम्हाला प्रेरणा मिळेल. मेलबर्न कसोटीत त्याच्या पदार्पणाचा आम्ही विचार करत आहोत.

https://twitter.com/cricketcomau/status/1076350741722193925

झाले असे की आर्चीला हृदयविकार आहे. ज्यामुळे त्याला अनेक शस्त्रक्रियांना समोरे जावे लागले आहे. तो जेव्हा फक्त तीन महिन्याचा होता तेव्हा त्याच्या हृदयाच्या वॉल्वमध्ये दोष असल्याचे समोर आले. ज्यामुळे त्याचे अनियमित हृदयाचे ठोके पडत होते. त्यामुळे त्याच्यावर योग्यवेळी उपचाराची गरज होती. याच कारणामुळे वेळोवेळी त्याच्यावर अनेक शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या.

आर्ची हा दिग्गज माजी लेग स्पीनर शेन वॉर्नला आदर्श मानतो. काही दिवसांपूर्वी त्याला आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्याकडून मेक ए विश या फाउंडेशनच्या मदतीने व्हिडिओ कॉल करण्यात आला. त्यावेळी त्याला आॅस्ट्रेलियन संघातील त्याच्या समावेशाबद्दल सांगण्यात आले.

त्याच्यासाठी हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. त्या कॉलच्या वेळी त्याचे पालकही त्याच्या बरोबर होते. पण लँगर यांनी त्याला अंतिम 11 मध्ये स्थानाची कोणतीही खात्री दिली नाही. पण तरीही त्याच्यासाठी आॅस्ट्रेलियन संघात समावेश हीच आनंदाची गोष्ट आहे.

https://twitter.com/cricketcomau/status/1069531298467729409

आर्ची जेव्हा अॅडलेड ओव्हल मैदानावर आला तेव्हा त्याला त्याची आॅस्ट्रेलियाची जर्सी देण्यात आली. तसेच त्याने संघाबरोबर सरावातही भाग घेतला होता. त्याचबरोबर आर्चीने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही बाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

https://twitter.com/cricketcomau/status/1069728467099369472

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११

टीम इंडियाचे हे दोन प्रमुख खेळाडू मेलबर्न कसोटीला मुकणार ?

योगाचार्य होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू सोडणार होता क्रिकेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment