आयसीसी वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावर्षीचा विश्वचषक भारतात खेलला जाणार असून भारतीय संघ पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. पण विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामना खेळला जाईळ 15 ऑक्टोबर रोजी. भारत आणि पाकिस्तान संघ या सामन्यात आमने सामने असणार आहेत. या सामन्याविषयी पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू शादाब खान याने प्रतिक्रिया दिली.
भारत आणि पाकिस्तान संघातील विश्वचषक आकडेवारीचा विचार केला, तर भारताचे पारडे जड दिसते. विश्वचषक स्पर्धांमध्ये फक्त एकदाच पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकू शकला आहे. 2021 टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने ही कामगिरी केली होती. पण वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानसाठी आजही अजिंक्य आहे. आगामी वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ भारताला पराभूत करून हा विजयाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल. पण असे असले तरी, पाकिस्तान भारताविरुद्धच्या विजयापेक्षा विश्वचषक विजयाला अधिक प्राधान्य देणार हे नक्की.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शादाब खान (Shadab Khan) याने भारताविरुद्धच्या सामन्याविषयी प्रतिक्रिया दिली. शादाब खान म्हणाला की, “शादाबविरुद्ध खेळताना एक वेगळीच मजा येते. अशा प्रकारच्या सामन्यातील दबाव देखील वेगळाच असतो. यावेळी आम्ही खेळू तेव्हा हे भारताचे होम ग्राउंड असेल. त्याठिकाणचा क्राउड देखील आमच्या विरोधात असेल. पण आम्ही त्याठिकाणी विश्वचषक खेळायला जाणार आहोत, फक्त भारताविरुद्ध खेळायला नाही. भारतात जाऊन आम्ही विश्वचषक गमावला, तर याला काहीच अर्थ राहत नाही.”
“माझ्या मते आम्ही भारताविरुद्ध पराभूत झालो आणि नंतर विश्वचषक जि्ंकलो, तर माझ्या मते हे आमच्यासाठी सर्वोत्तम असेल. कारण संघ म्हणून आमचे अंतिम लक्ष्य विश्वचषक जिंकणे आहे,” असे शादाब पुढे म्हणाला. दरम्यान, यापूर्वी 2019 वनडे विश्वचषकात जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते, तेव्हा पाकिस्तानला 89 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. रोहित शर्माने 140 धावांची वादळी खेळी केली होती. तसेच विराट कोहली याने 77 धावा कुटल्या होत्या. भारताने 50 षटकांमध्ये 336 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला पावसामुळे विजयासाठी 40 षटकात 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पाकिस्तानने मात्र 40 षटकांमध्ये 212 धावांपर्यंत मजल मारली होती. यावर्षीच्या वनडे विश्वचषकात देखील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे. (Shadab Khan comments on India vs Pakistan ODI World Cup match)
महत्वाच्या बातम्या –
एमपीएल चॅम्पियन रत्नागिरीवर पैशांचा पाऊस! कोल्हापूर संघही मालामाल, आकडा वाचाच
ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जेम्स अँडरसनच्या पुरनगामनावर विश्वास! सांगितले गोलंदाजाच्या अपयशाचे कारण






