मंगळवारी (दि. 03 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 10वा आणि अखेरचा सराव सामना खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा 14 धावांनी पराभव झाला. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र, प्रभारी कर्णधार शादाब खान याने हसत हसत याचे उत्तर दिले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 351 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ सर्व विकेट्स गमावत 337 धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना 14 धावांनी पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर शादाब खान (Shadab Khan) याने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
Pakistan fall short by 14 runs in the second warm-up match.
Iftikhar, Babar and Nawaz scored brisk half-centuries in the chase 🏏#PAKvAUS | #CWC23 | #WeHaveWeWill pic.twitter.com/Mx9wkyev4n
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 3, 2023
‘निकाल आमच्या हातात नव्हते’
पराभवानंतर शादाब खान म्हणाला, “हे निकाल महत्त्वाचे नाहीयेत. आम्ही यातून खूप सकारात्मक गोष्टी घेतल्या आहेत. आमचा दृष्टीकोन चांगला होता. मात्र, निकाल आमच्या हातात नव्हते. मला वाटते की, आमच्या संघात 11 खेळाडूंचा निर्णय झाला आहे. आम्ही फक्त राखीव खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी वेळ देऊ इच्छित होतो.”
‘आम्ही दररोज हैदराबादी बिर्याणी खातोय’
तो पुढे म्हणाला, “ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. आम्हाला हैदराबादमध्ये परिस्थितींचा थोडा अनुभव मिळाला आहे.” तो असेही म्हणाला की, “आम्ही दररोज हैदराबादी बिर्याणी खात आहोत आणि कदाचित त्यामुळे आमची गती मंदावली आहे.”
शादाबचे प्रदर्शन
शादाब खान याच्या सामन्यातील प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 69 धावा खर्चून 1 विकेट घेतली. तसेच, फलंदाजी करताना 9 धावाही केल्या. पाकिस्तानला 2 सराव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, संघ या पराभवातून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिला सामना नेदरलँडविरुद्ध 6 ऑक्टोबर रोजी आहे.
तसेच, 10 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध पाकिस्तानला भिडायचे आहे. आशा आहे की, या सामन्यांमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू धमाकेदार प्रदर्शन करत चाहत्यांचे मनोरंजन करतील. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (shadab khan hilarious reaction said eating hyderabadi biryani daily after pak vs aus warm up match)
हेही वाचा-
‘हे’ 3 धुरंधर भारतीय संघाला बनवू शकतात वर्ल्डकप चॅम्पियन, पुन्हा एकदा होणार स्वप्न साकार!
याला म्हणतात झोकून देणं! वर्ल्डकपपूर्वी राहुलने टायर ठेवून केला विकेटकीपिंगचा सराव, दिग्गजाने सांगितलं कारण