पाकिस्तान संघाचा फिरकी गोलंदाज शादाब खान हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतो. तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. नुकतेच त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रश्न उत्तरांचे एक सत्र आयोजित केले होते. ज्यामध्ये त्याने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच त्याने,आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना मिळवलेल्या आवडत्या विकेटचा देखील खुलासा केला आहे.
या प्रश्नोत्तराच्या सत्रात अनेकांनी त्याला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीशी जोडलेल्या गमतीदार गोष्टी विचारल्या. तर एका युजरने विचारले होते की, असा कुठला फलंदाज आहे, ज्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना तुला अडचणीचा सामना करावा लागला आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने रोहित शर्माचे नाव घेतले होते. शादाबच्या मते, रोहितला गोलंदाजी करणे सर्वात कठीण आहे.
Toughest bat is Rohit Sharma. Toughest bowler is Ferguson #AskShadab https://t.co/LRuTROaYEK
— Shadab Khan (@76Shadabkhan) May 31, 2021
तसेच आणखी एका युजरने विचारले होते की, क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत जितके विकेट घेतल्या आहेत, त्यापैकी तुझी आवडता विकेट कोणती? या प्रश्नाचे उत्तर देताना देखील त्याने रोहित शर्माचे नाव घेतले होते.
Rohit Sharma #AskShadab https://t.co/aZadrhJwNf
— Shadab Khan (@76Shadabkhan) May 31, 2021
शादाबने भारतीय संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण ५ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदा रोहित शर्माला क्लिनबोल्ड केले होते. याच विकेटला तो आपल्या कारकिर्दीतील सर्वात आवडती विकेट मानतो.
रोहित शर्माने पाकिस्तान सांघविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोहितने पाकिस्तान संघाविरुद्ध ५ वनडे सामने खेळले आहे.यात त्याला ३९४ धावा करण्यात यश आले होते. यापूर्वी,पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज मोहम्मद आमिरने देखील रोहित शर्माबद्दल वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, “रोहित शर्माला गोलंदाजी करणे माझ्यासाठी कठीण नव्हते. मी त्याला सहजरीत्या बाद करू शकतो.”
शादाब खानने आतापर्यंत एकूण ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला १४ गडी बाद करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याला ४५ वनडे सामन्यात ५९ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच त्याच्या टी -२० क्रिकेटमधील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ४६ सामने खेळले आहेत.यात त्याला ५३ गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नरसह ३८ खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामान्यांना मुकणार?
इंग्लंड संघात बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत ५१७ कसोटी विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडला मिळाली मोठी जबाबदारी