---Advertisement---

उपकर्णधाराचे संघातील स्थान धोक्यात! ‘या’ कारणास्तव विश्वचषकातून नाव कापले जाणार?

Shadab Khan
---Advertisement---

माही दिवसांपूर्वीपर्यंत शादाब खान याचे पाकिस्तानच्या विश्वचषक संघातील स्थान पक्के होते. आशिया चषकात त्याने पाकिस्तनसाठी उपकर्णधाराची भूमिका पार पाडली होती. पण वैयक्तिक प्रदर्शनाच्या बाबतीत शादाब खान आशिया चषकात कमी पडला. याच पार्श्वभूमीवर वनडे विश्वचषक संघातून त्याचे नाव वगळले जाऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत.

शादाब खान () आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाचा उपकर्णधार होता. वनडे विश्वचषकात देखील तो संघाचा उपकर्णधार असेल, हे निश्चित मानले जात होते. पण आशिया चषकातील शादाबचे प्रदर्शन त्याला माहागात पडू शकते. त्याने आशिया चषक स्पर्धेत अवघ्या तीन विकेट्स घेतल्या. सोबतच विजेतेपदासाठी दावेदार मानला जाणारा पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात देखील पोहोचू शकला नाही. परिणामी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि संघ व्यवस्थापन काही वरिष्ठ खेळाडू्ंच्या प्रदर्शनावर नाराज आहेत. शादाब खान त्यापैकीच एक नाव आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार वनडे विश्वचषकात शादाबच्या जागा घेण्यासाठी फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) याचे नाव चर्चेत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार पीसीबी पाकिस्तान संघाच्या प्रशासनात देखील काही बदल करू शकते. वृत्तांनुसार, कर्णधार आणि मुख्य निवडकर्ते खेळाडूंची फिटनेस आणि खराब फॉर्मबाबत निर्णय घेऊ शकतात. मागच्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान संघातील काही महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. अबरार अहमद जर विश्वचषक संघात समील झाला, तर तो संघासाठी शादाबपेक्षा अधिक गतीने फिरकी गोलंदाजी करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत फक्त 6 कसोटी सामने खेळले आहेत. पण यादरम्यान त्याला तब्बल 38 विकेट्स मिळाल्या. पाकिस्तानचे मुख्य निवडकर्ते इंजमाम-उल-हक याच कारणास्तव अबरारवर खुश असल्याचे सांगितले जात आहे. (Shadab Khan’s name may be cut from the Pakistan’s World Cup squad)

महत्वाच्या बातम्या – 
रडणार नाही लढणार! निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झालेल्या सॅमसनची पोस्ट व्हायरल
धक्कादायक! ‘जेंटलमन’ चेतेश्वर पुजारा काऊंटी स्पर्धेतून सस्पेंड, वाचा कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---