भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यादरम्यान बुधवारपासून (१६ जून) एकमेव कसोटीला सुरुवात झाली. ब्रिस्टल येथे हा सामना खेळला जात आहे. तब्बल सात वर्षांनंतर कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघासाठी या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवा शेफाली वर्मा हीने एका विशेष यादीमध्ये स्थान पटकावले.
भारतीय संघासाठी केले पाच खेळाडूंनी पदार्पण
इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघांतील पाच खेळाडूंनी एकाच वेळी कसोटी पदार्पण केले. यामध्ये यष्टीरक्षक तानिया भाटिया, युवा सलामीवीर शेफाली वर्मा, वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकार, अष्टपैलू दीप्ती शर्मा व फिरकीपटू स्नेह राणा यांचा समावेश होता. शेफाली वर्मा हिने या सामन्यातून पदार्पण करताना भारतासाठी सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये तिसरे स्थान मिळवले. शेफालीचे वय सध्या १७ वर्ष १३९ दिवस आहे.
सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या भारतीय महिला
भारतासाठी सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेट खेळण्याचा मान रजनी वेणुगोपाल यांच्याकडे जातो. त्यांनी अवघ्या १५ वर्ष २८३ दिवस असे वय असताना भारतासाठी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी माजी भारतीय दिग्गज महिला क्रिकेटपटू शुभांगी कुलकर्णी या आहेत. शुभांगी यांनी १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे १७ वर्ष १०४ दिवस इतके होते.
त्यानंतर शेफाली तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये चौथ्या स्थानी नीतू डेविड यांचा क्रमांक लागतो. त्यांनी १९९५ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना १७ वर्ष १५९ दिवस इतके वय असताना खेळला होता. (Shafali Verma becomes third youngest women cricketer who play test for India)
भारताची भविष्य मानली जाते शेफाली
आपल्या आक्रमक फलंदाजीने अल्पावधीतच ओळख बनविणाऱ्या शेफाली वर्मा हिला क्रिकेटची भविष्यातील सर्वात मोठी खेळाडू म्हटले जाते. २०२० महिला टी२० विश्वचषकात तिने तुफान फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली होती. आगामी काळात ती ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश तर, इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ लीग खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आमिरच्या चेंडूवर फलंदाजाने गुडघ्यावर बसत खेचला चौकार, मग गोलंदाजाने चिडून केलं असं काही
व्हीव्हीएस लक्ष्मणने रोहित शर्माला दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘या’ गोलंदाजापासून सावधान