वुमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात शनिवारी (11 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात दिल्लीने गुजरातला अक्षरशः नामोहरम केले. विजयासाठी मिळालेल्या 106 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सलामीवीर शफाली वर्माने वादळी फलंदाजी करत हे लक्ष केवळ 7.1 षटकात पार करून देत संघाला तिसरा विजय मिळवून दिला. शफालीने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचे मन जिंकले.
𝗧𝗵𝗲 𝗦𝗵𝗮𝗳𝗮𝗹𝗶 𝗩𝗲𝗿𝗺𝗮 𝗦𝗵𝗼𝘄!
76* off just 28 deliveries with 🔟 fours & 5⃣ sixes 🔥🔥
WATCH @TheShafaliVerma's entertaining knock 🍿🔽 #TATAWPL | #GGvDC https://t.co/tw48k0FLCP
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2023
पहिले दोन सामने आरामात जिंकल्यानंतर दिल्लीला तिसऱ्या सामन्यात मुंबईने पराभूत केले होते. या सामन्यात दिल्लीला प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. अष्टपैलू मारिझान कापने पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत गुजरातचा डाव 9 बाद 105 वर रोखला. विजयासाठी मिळालेल्या 106 धावांचा पाठलाग करताना शफाली वर्माने एकहाती सामना दिल्लीकडे नेला.
पहिल्या सामन्यात केलेल्या तुफानी खेळीनंतर तिने या सामन्यातही आपले खरे रूप दाखवले. पहिल्या षटकापासून तिने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. चौकार षटकारांची आतिषबाजी करत तिने 19 चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. हे स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यानंतरही ती थांबली नाही. दिल्लीने विजयासाठी मिळालेले आव्हान 7.1 षटकात पूर्ण केले. तिने अखेरपर्यंत नाबाद राहत 28 चेंडूवर 76 धावा कुटल्या. यामध्ये 10 चौकार व 5 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. या खेळीनंतर ती ऑरेंज कॅप मिळवण्याच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी देखील पोहोचली आहे.
शफाली वर्मा ही आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. जानेवारी महिन्यात झालेल्या महिला अंडर 19 क्रिकेट क्रिकेट विश्वचषकात तिने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा विश्वचषक आपल्या नावे केलेला. त्यानंतर वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात दिल्लीने तिच्यावर दोन कोटी रुपयांची मोठी बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले होते.
(Shafali Verma Hits 28 Balls 76 In WPL Match Against Gujarat Giants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काप-शफालीच्या झंझावाताने दिल्ली विजयी मार्गावर! गुजरातविरूद्ध 7.1 षटकात पार केले विजयी आव्हान
विराटबाबत हे काय बोलून गेला ऑसी दिग्गज? म्हणाला,”वर्ल्डकपसाठी तो आयपीएल…”