दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जात गेलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने या अंतिम सामन्यात दर्जेदार खेळ दाखवत इंग्लंडवर 7 गडी राखून विजय मिळवला. यासोबतच या पहिल्या विश्वचषकाचा मानकरी भारतीय संघ ठरला. या विश्वचषकात शफाली वर्मा हिने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. सामन्यानंतर बोलताना तिने या विश्वचषकावर समाधानी नसून, पुढील महिन्यात आणखी एक विश्वचषक जिंकण्याचा मनोदय बोलून दाखवला.
पोचेस्ट्राम येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टिटस साधू, पार्श्वी चोप्रा व अर्चना चोप्रा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत इंग्लंडला केवळ 68 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर शफाली वर्मा, सौम्या तिवारी व गोंगडी त्रिशा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे पहिले विजेतेपद ठरले.
या सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना संघाची कर्णधार शफाली वर्मा अत्यंत भावूक दिसली. ति संपूर्ण संभाषणा दरम्यान रडताना दिसून आली. त्याचवेळी तिला, ‘फेब्रुवारी महिन्यानंतरही हा एकमेवच विश्वचषक तुझ्या खात्यात असेल का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली,
“अजिबात नाही, यापेक्षा मोठा विश्वचषक पुढील महिन्यात जिंकायचा आहे.”
दक्षिण आफ्रिकेतच फेब्रुवारी महिन्यात वरिष्ठ महिला टी20 विश्वचषक खेळला जाईल. शफाली त्या संघाचा देखील भाग आहे. 2020 टी20 विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरी पर्यंतचा प्रवास केलेला. मात्र, भारताला विजय मिळवण्यात अपयश आलेले. या विश्वचषकात हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तर, शफाली ही स्मृती मंधानासह सलामीवीर म्हणून फलंदाजीला उतरेल.
(Shafali Verma Hoping Senior Womens T20 World Cup Next Month After U19 T20 World Cup Win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या सामन्यात भारताने गमावली नाणेफेक, टीम इंडियापुढे मालिका हातात ठेवण्याचे आव्हान
U19 टी20 वर्ल्डकप: भारतीय मुली इतिहास रचण्याच्या नजीक; विश्वविजयासाठी केवळ 69 धावांचे आव्हान






