---Advertisement---

अशी कामगिरी करणे भल्याभल्यांना जमत नाही, पण १६ वर्षीय शेफालीने ती करुन दाखवली!

---Advertisement---

काल (25 फेब्रुवारी) पर्थ (Perth) येथे भारतीय महिला संघ विरुद्ध बांगलादेश महिला संघात (Indian Women’s Team vs Bangladesh Women’s Team) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) सामना पार पडला. हा सामना भारताने 18 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) उत्कृष्ट खेळी करत अनोखा विक्रम केला आहे.

शेफालीने या सामन्यात 17 चेंडूत 39 धावांची खेळी होती. यामध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. या खेळीमुळे तिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्यामुळे टी20 विश्वचषकात सामनावीर पुरस्कार मिळविणारी शेफाली सर्वात कमी वयाची क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच कोणत्याही विश्वचषकात (वनडे/टी20) पहिला सामनावीर पुरस्कार मिळवणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची युवा क्रिकेटपटू ठरली आहे. काल जेव्हा तीने हा पुरस्कार स्विकारला त्यावेळी तिचे वय 16 वर्षे आणि 27 दिवस एवढे होते.

क्रिकेट विश्वचषकात(वनडे/टी20) सर्वात कमी वयात पहिला सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेची डेन व्हॅन निकेर्कच्या (Dane van Niekerk) नावावर आहे. तिने 2009 ला झालेल्या महिला वनडे विश्वचषकात श्रीलंका विरुद्ध 15 वर्षे 304 दिवस एवढे वय असताना सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.

यापूर्वी शेफालीने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 30 वर्षे जुना विक्रम मोडला होता. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये विंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तिने 49 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 73 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. हे शेफालीचे आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील पहिले अर्धशतक होते.

यामुळे शेफाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारी भारताची सर्वात युवा महिला क्रिकेटपटू ठरली होती. शेफालीने ही कामगिरी 15 वर्षे आणि 285 दिवस एवढे वय असताना पूर्ण केली होती. तर सचिन तेंडुलकरने आपले पहिले अर्धशतक 16 वर्ष आणि 214 दिवस या वयात पूर्ण केले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---