भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शफाली वर्मा तिने आपल्या सोबत विमानतळावर गैरवर्तन केल्याचा एका एअरलाईनवर आरोप केला आहे. तिने ट्विट करत या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. मात्र, असे असतानाही अनेकांनी तिलाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
शफालीला शनिवारी (12 ऑगस्ट) दिल्लीहून वाराणसीला जायचे होते. मात्र, ती उड्डाणाच्या 25 मिनिटांपूर्वी विमानतळावर पोहोचली. त्यामुळे त्यांना विमानतळावर प्रवेश देण्यात आला नाही. शफालीने लिहिले की, तिने खूप विनंत्या केल्या होत्या, पण तिला प्रवेश दिला गेला नाही. तसेच कर्मचाऱ्यांनी आपल्याला योग्य वागणूक दिली नाही असे देखील तिने नमूद केले. हा चांगला अनुभव नसल्याचे तिने म्हटलं.
✈️ Delhi to Varanasi: I came 25mins before the departure time and we requested a lot, still I was denied entry. The staff’s behaviour was very rude. #indigo this wasn’t a good experience.#6e #flybetter
— Shafali Verma (@TheShafaliVerma) August 11, 2023
तिच्यावर टीका करताना एका ट्विटर वापरकर्त्यांने लिहिले’
‘मॅडम, विमानतळावर कमीत कमी एक तास आधी जायला लागते.’
अन्य एका वापरकर्त्याने म्हटले,
‘त्यांची काहीही चूक नाही ते केवळ नियमांचे पालन करत होते.’
भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख सलामीवीर असलेली शफाली मागील वर्षी अंडर 19 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार राहिली आहे. नजीकच्या काळात ती आता भारतीय संघासह एशियन गेम्समध्ये खेळताना दिसेल.
विमानतळावर खेळाडूंना वाईट अनुभव येण्याचे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. मागील वर्षी भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला मुंबई विमानतळावर अशाच प्रकारे वाईट वागणुकीला सामोरे जावे लागलेले. तर, काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला लंडन विमानतळावर सामान मिळण्यासाठी वाट पाहावी लागलेली.
(Shafali Verma Upset After Bad Behaviour At Delhi Airport)
महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । आपल्या खेळाडूंवर हार्दिकला विश्वास! चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावली, पण प्लेइंग इलेव्हन तीच
‘तो कंफ्यूज दिसत होता…’, हार्दिकच्या नेतृत्वाबाबत भारतीय खेळाडूची मोठी प्रतिक्रिया