यावर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व नितीश राणा करत आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या हंगामात खेळू शकला नाही. चालू हंगामातील पहिल्या 11 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये राणाने केकेआरला विजय मिळवून दिला आहे. लीग शेवटच्या टप्यात जात असताना सर्व संघ प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्याच्या प्रयत्नात आहेत. असातच राणाला केकेआरचा मालक शाहरुख खान याने स्वतः फोन करून पाठबळ दिले आहे.
एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नितीश राणा () याने शाहरुख खान () याचा फोन आला होता, अशी माहिती दिली. राणा म्हणाला, “शाहरुख खानचा फोन आला होता. विश्वास ठेव, कर्णधार म्हणून तू चांगले प्रदर्शन करत आहेस. स्वतःवर विश्वास ठेव. जास्त चिंता करण्याची गरज नाहीये. तुला जे योग्य वाटेल ते कर, माझा पाठिंबा असेलच.”
दरम्यान, केकेआरने आयपीएल इतिहासात आतापर्यंत दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 2012 आणि 2014 आयपीएल हंगामात गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजेतेपद पटकावले होते. पण यावर्षी केकेआरसाठी प्लेऑफपर्यंतचा प्रवास कठीण दिसत आहे. पहिल्या 11 पैकी 5 सामन्यांमध्ये केकेआरला विजय मिळाला आहे. लीग स्टेजचे अजून तीन सामने संघाला खेळायचे आहेत. या तीनपैकी एक जरी सामना केकेआरने गमावला, तर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल.
आयपीएलच्या गुणतालिकेत केकेआर संघ सध्या पाच विजयांसह सहाव्या क्रमांकावर आहे. संघाकडे 10 गुण असून नेट रन रेट 0.079 आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहेत. गुजरात आणि चेन्नईने अनुक्रमे 8 आणि 7 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स 11 पैकी 6 सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथा क्रमांक लखनऊ सुपर जायंट्सचा (11 पैकी 5 विजय) आहे. गुरुवारी (11 मे) केकेआर हंगामातील आपला 12 वा सामना खेळण्यासाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरेल. (Shah Rukh Khan called and praised Nitish Rana’s captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Toss: प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी कोलकाता अन् राजस्थान आमने-सामने, ‘या’ जबरदस्त गोलंदाजाचे कमबॅक
अंबानींचा जबरदस्त प्लॅन! आर्चरला संघाकडून खेळवण्यासाठी इंग्लंडला घ्यावी लागणार मुंबईची परवानगी?