आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) बॅंगलोर येथे पार पडला. या लिलावात १० फ्रॅंचायझींमध्ये अनेक खेळाडूंसाठी चूरशीची लढत पाहायला मिळाली. तमिळनाडूचा फलंदाज शाहरुख खानला( shahrukh khan) पंजाब किंग्जने ९ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात शाहरुख पुन्हा पंजाब संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंजाब संघाने मागील वर्षी त्याला ५ कोटी रुपयांत खरेदी केले होते.
शाहरुख खान यावेळी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून खेळेल अशी आशा सर्वांना होती. त्याल्या स्वत:ला सुद्धा असे वाटले होते की चेन्नई संघ त्याच्यावर बोली लावेल, परंतु असे काही झाले नाही. शाहरुखने यावर त्याचे मत मांडले आहे.
शाहरुख म्हणाला की, “खरे तर मी आयपीएल सुरु झाल्यापासून सीएसकेला फाॅलो आणि लाइक करतो. मी आजपण चेन्नईला खूप पाठिंबा देतो. कारण चेन्नईचे लोक नेहमी सीएसकेला त्यांच्या हृदयात ठेवतात. पंजाब किंग्जकडून संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. मला वाटत होते की मला पंजाब किंग्जने खरेदी करावे. कारण आयपीएलमध्ये पहिली संधी मला पंजाबने दिली होती. मी ज्या पद्धतीने बोलत आहे, त्यावरुन तुम्हाला समजेल की माझे मन सीएसकेसाठी होते. तरीही पंजाब किंग्जकडे परत जाणे चांगले आहे.”
गतवर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात शाहरुख खानने शानदार कामगिरी केली, त्यावेळी भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला फलंदाजी करताना पाहिले. त्यामुळे आयपीएलच्या १५ व्या हंगामात सीएसके त्याला विकत घेईल असे वाटले होते.
Punjab di shaan, Shahrukh Khan! 💥#TATAIPLAuction #SaddaPunjab #PunjabKings #IPLAuction @shahrukh_35 pic.twitter.com/57rViYwBrR
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 12, 2022
आयपीएलपूर्वी आता तो भारतीय संघाकडून वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. शाहरुख खानला राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी १०० च्या आसपास खेळाडूंची विक्री झाली. आता रविवारी (१३ फेब्रुवारी) उरलेल्या खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या मेगा लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्यवधी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर अनेक अनुभवी खेळाडूंना मोकळ्या हातांनी माघारी परतावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
यूपीच्या अष्टपैलूवर गुजरात टायटन्सने लावला डाव, तब्बल ३.२० कोटींची किंमत केली खर्च
अनकॅप्ड महिपाल लोमरोरची चांदी, ‘इतक्या’ लाखांसह आरसीबीत सामील; आयपीएलचा आहे चांगला अनुभव
‘वर्ल्ड चॅम्पियन’ कर्णधार झाला लखपती; ‘या’ संघात मिळाले स्थान