आयपीएलच्या 17 व्या हंगामात फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह कोलकाता हा आयपीएलमध्ये तिसरा सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा संघ ठरला. केकेआरनं 10 वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर संघाचा मालक शाहरुख खान खूपच खूश दिसत होता. संघाचे अभिनंदन करण्यासाठी तो फक्त मैदानातचं आला नाही, तर संघाला भरभरून प्रेमही दिलं.
सामना संपल्यानंतर शाहरुख खान मैदानात आला. त्यानं संघाचा मेन्टाॅर गौतम गंभीरचा मुका घेतला. त्यानंतर त्यानं कर्णधार श्रेयस अय्यरलाही मिठी मारली. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Shah Rukh Khan giving flying kiss with Harshit Rana along with him. 😄👌 pic.twitter.com/ZEYa6SP7ko
— Johns. (@CricCrazyJohns) May 26, 2024
Shah Rukh Khan kissing Gautam Gambhir 💜
SRK brings back Gambhir again & he has written a great comeback story.#ShahRukhKhan #KKRvsSRHFinal pic.twitter.com/npJRQe90Jg
— S U B H A N K A R 𓀠 (@AttitudeimSRK12) May 26, 2024
शाहरुख खाननं संपूर्ण संघाला भरभरुन प्रेम दिलं. सर्व खेळाडूंचं खूप कोतुक केलं. तसंच फायनल सामन्याचा सामनावीर पुरस्कार पटकावलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचंही शाहरुख खाननं खूप कौतुक केलं. मिचेल स्टार्कनं फायनल सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून आक्रमक गोलंदाजी केली. आणि केकेआरच्या विजयासाठी मोलाचं योगदानं दिलं.
केकेआरच्या विजयात व्यंकटेश अय्यरनं आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. त्यानं केवळ 26 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी खेळली. याशिवाय केकेआरला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून देण्यात आंद्रे रसेलने ३ बळी, मिचेल स्टार्कने 2 बळी, हर्षित राणा 2 बळी, तर वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, वैभव अरोरा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले. आणि केकेआरच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
महत्वाच्या बातम्या-
नितीश रेड्डी उदयोन्मुख खेळाडू तर मॅकगर्क सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर; जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला सुनील नारायणची जादू अन् गौतम गंभीरचा गुरुमंत्र! ‘या’ 5 कारणांमुळे केकेआर 10 वर्षांनंतर बनली चॅम्पियन आयपीएलच्या चमकदार कामगिरीनं केकेआरचं ‘हे’ खेळाडू झाले मालामाल!