नागपुर। नागपुर जिल्हा हार्ड कोर्ट टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आर्यन पम्प्स एमएसएलटीए 15000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सहजा यमलापल्ली, झील देसाई या भारतीय खेळाडूंसह रशियाच्या ऍना उरके, जर्मनीच्या एमिली सेबोल्ड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नागपूर,रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित जेनिफर लुईखेमचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. हा सामना 1 तास 27 मिनिट चालला. अव्वल मानांकित झील देसाई हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सातव्या मानांकित समा सात्विकाचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित रशियाच्या ऍना उरकेने भारताच्या साई संहिता चमर्तीचा 6-3, 6-3 असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित जर्मनीच्या एमिली सेबोल्डने पाचव्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरीचे आव्हान 6-0, (5)6-7, 6-0 असे मोडीत काढले.
दुहेरीत उपांत्य फेरीत श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व समा सात्विका या जोडीने वैदेही चौधरी व एमिली सेबोल्डया अव्वल मानांकित जोडीचा (3)6-7, 6-4, 13-11 असा तर, दुसऱ्या सामन्यात साई संहिता चमर्थी व सोहा सादिक यांनी निधी चिलूमुला व सौम्या विज या तिसऱ्या मानांकित जोडीचा 7-6(3), 3-6, 10-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि. जेनिफर लुईखेम(भारत)[6] 6-4, 6-4
झील देसाई(भारत)[1]वि.वि. समा सात्विका(भारत)[7] 6-2, 6-1
ऍना उरके(रशिया)[2]वि.वि. साई संहिता चमर्ती(भारत) 6-3, 6-3
एमिली सेबोल्ड(जर्मनी)[3] वि.वि. वैदेही चौधरी(भारत)[5] 6-0, 6(5)-7, 6-0
दुहेरी: उपांत्य फेरी:
साई संहिता चमर्थी(भारत)/सोहा सादिक(भारत)वि.वि.निधी चिलूमुला(भारत)/सौम्या विज(भारत)[3]7-6(3), 3-6, 10-7
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)/समा सात्विका(भारत)वि.वि.वैदेही चौधरी(भारत)/एमिली सेबोल्ड(जर्मनी)[1] (3)6-7, 6-4, 13-11
महत्त्वाच्या बातम्या –
पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ७ मार्चपासून
भन्नाटच! पाकिस्तान विरुद्ध भारतीय यष्टीरक्षक ऋचा घोषचा अचंबित करणारा झेल, पाहा व्हिडिओ
टीम इंडिया है ये, झुकेगी नहीं…! मोहाली कसोटी विजयानंतर विराटचे ‘पुष्पा सेलिब्रेशन’, व्हिडिओ व्हायरल