शुक्रवारी(12 जानेवारी) पासून न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पाच टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली. यातील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळला गेला. या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा नव्याने कर्णधार झालेल्या शाहीन शाह आफ्रिदीची अशी धुलाई झाली की, तो हा सामना कधीच विसरु शकणार नाही. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज फिन एलेनने कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीच्या तिसऱ्या षटकात तब्बल तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK) मधील या पहिल्या टी20 सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात विकेट मिळवल्यानंतर पाकिस्तानचा हा निर्णय एकदम योग्य वाटत होता. परंतू न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुरु केलेल्या फटकेबाजीपुढे कुणाचाच निभाव लागला नाही. विकेटची काळजी न करता न्यूझीलंडने केलेल्या आक्रमणाचा शिकार पाकिस्तानचा नवोदीत कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी (Shaeen Shah Afridi) झाला. डावाच्या तिसऱ्या षटकात आफ्रिदीचा चेंडू सलग पाचवेळा सीमारेषेबाहेर गेला. यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार यानंतर सलग तीन चौकार आणि पुन्हा एकदा षटकार अशा तब्बल 24 धावा एकाच षटकात पहायला मिळाल्या. आफ्रिदीच्या कारकिर्दीतील हे सर्वात महागड षटक ठरलं. (shaheen afridi goes for 24 run in one over pakistan poor start against new zealand t20 phil allen)
हीच लय पुढे सुरु ठेवत न्यूझीलंडने 20 षटकात एकूण 226 धावांचा डोंगर पाकिस्तान संघासमोर उभा केला. यामध्ये आफ्रिदीने चार षटकात 11.50 च्या सरासरीने 46 धावा खर्च केल्या. त्यासोबत पाकिस्तानचा आणखी एक धडाडीचा गोलंदाच अमेर जमाल (Amer Jamal) यालाही भलताच चोपला. अमीरने आपल्या चार षटकात तब्बल 13.75 च्या सरासरीने 55 धावा खर्च केल्या.
दरम्यान, ही मालिका पाच सामन्यांची असून दुसरा सामना न्यूझीलंडच्या हॅमील्टनमध्ये रविवारी(14 जानेवारी) रोजी खेळवला जाईल. पहिल्या सामन्यातील खराब गोलंदाजीमुळे टीका होत असलेला पाकिस्तानचा कर्णधार आफ्रिदी दुसऱ्या सामन्यात लय पकडणार का याकडे सर्वांच लक्ष लागून राहिल. दूसरीकडे सोशल मिडीयावर न्यूझीलंडचा सलामी फलंदाज फिन एलेनचं न्यूझीलंडच्या चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे. (NZ vs PAK New Zealand batsman thrashes Afridi scores ‘so many’ runs in an over)
महत्वाच्या बातम्या
IND vs AFG । रोहितचा गिलवरील संताप योग्य! कर्णधाराच्या रनआऊटवर दिग्गजाची प्रतिक्रिया
नुसता धुराळा! क्रिकेटचा सामना खेळायला डेविड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये