पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने मोठी प्रतिक्रिया दिली. मागच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात पोहोचला, पण इंग्लंडकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शाहीन आफ्रिदीला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दुखापत झाल्याने पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. आता वेगवान गोलंदाजाने या सामन्यात आपल्याला झालेल्या दुखापतीविषयी प्रतिक्रिया दिली.
शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याला मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी त्याने आपली फिटनेस मिळवली होती आणि मैदानात पुनरागमन केले होते. विश्वचषकादरम्यान त्याने पाकिस्तान संघासाठी महत्वाची भूमिकाही पार पाडली. पण अंतिम सामन्यात ऐन वेळी त्याची दुखापत पुन्हा एकदा उद्भवली. शाहीनची दुखापत पाकिस्तान संघाला महागात पडल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने हा अंतिम सामना 5 विकेट्सने जिंकला होता. पाकिस्तानचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.
शाहीन आफ्रिदीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मला 2021 चा टी-20 विश्वचषक अजूनही आठवतो. तसेच 2022चा विश्वचषकही महत्वाचा होता. महत्वाच्या वेळी मी दुखापतग्रस्त झालो नसतो, तर आमचा संघ विश्वचषक जिंकू शकत होता. मी फिट असतो तर गोलंदाजी केली असती आणि आम्ही ही स्पर्धा जिंकू शकतो. पण दुखापत आपल्या हातात नाही, ती कधीही होऊ शकते.”
दरम्यान, अंतिम सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर शाहीनला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही माघार घ्यावी लागली. इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानने तीन सामन्यांची कसोटी, न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. या तिन्ही मालिकांमध्ये दुखापतग्रस्त शाहीनला खेळता आले नाही. शाहीन आफ्रिदीच्या मते मायदेशातील या मालिकातून बाहेर बसणे त्याच्यासाठी कठीण बाब होती. कसोटी मालिकेत खेळायला मिळणार नाही, यामुळे शाहीन जास्त निराश होता. (Shaheen Afridi injured in 2022 T20 World Cup final, pacer expresses disappointment)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी तर म्हणेल त्याची संघात…’, टी20 विश्वचषकातील विराटच्या संघातील स्थानाविषयी स्पष्टच बोलले गावसकर
IPL संपल्यानंतर अफगाणिस्तानला जाता जाता गंभीरविषयी ‘हे’ काय बोलून गेला नवीन, एक नजर टाकाच