सोमवारी (२४ जानेवारी) पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) याला आयसीसी प्लेअर ऑफ द ईयर (icc player of the year) पुरस्काराने सन्मानित केले गेले. मागच्या वर्षी शाहीनने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते, त्यासाठी त्याला हा मानाचा पुरस्कार दिला गेला. पुरस्कार भेटल्यानंतर त्याने मागच्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ठ विकेटचा खुलासा केला. मागच्या वर्षी टी२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आमना सामना झाला होता, जो शाहीनसाठी अविस्मरणीय राहिला.
शाहीन अफ्रिदीने भारताविरुद्धच्या टी२० विश्वचषकातील सामन्यात तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल आणि त्यावेळी संघाचे नेतृत्व करणारा विराट कोहली यांचा समावेश होता. पाकिस्तान संघाने या सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारताविरुद्ध विश्वचषकात मिळवलेला पाकिस्तानचा हा पहिलाच विजय ठरला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शाहीन अफ्रिदी म्हणाला की, “मी कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा पाच विकेट्स घेत चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय सामना तो आहे, ज्यामध्ये आम्ही भारताविरुद्ध विजय मिळवला होता.”
शाहीन अफ्रिदी म्हणाला की, “माझ्यासाठी मागचे वर्ष अप्रतिम राहिले. मला आशा आहे की, मी २०२२ मध्येही चांगले प्रदर्शन करेल.” पुढे बोलताना शाहीन अफ्रिदीने टी२० विश्वचषकातील केएल राहुलच्या विकेटला त्याची मागच्या वर्षीची सर्वोत्कृष्ट विकेट सांगितले. तो म्हणाला, “चेंडू थोडा स्विंग करत होता आणि आम्हाला माहिती होते की, रोहितला लवकर बाद करत येऊ शकते, पण ज्या चेंडूवर राहुल बाद झाला, त्या चेंडूने मलाही हैराण केले.”
केएल राहुल ज्या चेंडूवर बाद झाला, तो टाकण्यासाठी शाहीनला पाकिस्तानचा अनुभवी शोएब मलिकने सल्ला दिला हेता. शाहीन पुढे बोलताना म्हणाला की, “इमानदारीने सांगायचे तर, चेंडू जास्त स्विंक करत नव्हता. पण मी चांगल्या वेगाने गोलंदाजी करत होतो. मलिकने मला सांगितले की चेंडूचा टप्पा पुढे टाक आणि त्याला थोडे स्विंग होऊ दे. मला अपेक्षित नव्हते की चेंडू एवढा स्विंग होईल. ही माझ्यासाठी एक उत्कृष्ट विकेट होती.”
महत्वाच्या बातम्या –
अखेर लखनऊ फ्रेंचायझींचे झाले नामकरण! ‘या’ नावाने उतरणार आयपीएलमध्ये
“विराटचे यश अनेकांना पचले नसते”
‘मिशन अकंप्लिशड’! वनडे मालिका विजयानंतर कर्णधार बवुमाने दिली भावनिक प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहा –