क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हटले जाते. याचे उदाहरण खेळाडू नेहमीच मैदानात देत असतात. खेळ सुरू असताना आक्रमक होणारे आणि संताप व्यक्त करणारे खेळाडू अनेकदा चाहत्यांचे मन जिंकणारे कृत्य देखील करत असतात. पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा आपल्या धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु अनेकदा त्याने खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवून आणले आहे. असेच काहीसे कृत्य त्याने रविवारी झालेल्या सामन्यात केल्याचे पाहायला मिळाले आहे.
रविवारी (१३ जून) झालेल्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इस्लामाबाद युनायटेड संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. संघातील पाच फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर डाव सांभाळण्याची जबाबदारी इफ्तिखार अहमद आणि असिफ अली यांच्यावर आली होती.
तर झाले असे की, सहाव्या षटकात संघ अडचणीत असताना आसिफ अलीने जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. त्याची फलंदाजी पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. तसेच त्याने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये ७५ धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये त्याने ५ षटकार आणि ६ चौकार लगावले होते. अशातच १९ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर आसिफ अलीकडून एक मोठी चूक झाली.
लाहोर कलंदर्स संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला. तो चेंडू आसिफने फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो शॉट खेळताना यष्टीच्या अगदी जवळ उभा होता. त्यामुळे त्याचा पॅड यष्टीला लागून तो बाद झाला होता.
There is no haar when there is so much pyaar in #HBLPSL6#MatchDikhao l #IUvLQ pic.twitter.com/6qeJebcf6o
— PakistanSuperLeague (@thePSLt20) June 13, 2021
त्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या भावी जावई शाहीन आफ्रिदीने मन जिंकणारे कृत्य केल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या खेळीनंतर बाद झाल्यावर आसिफ अली निराश होऊन पवेलियनच्या दिशेने जात होता. त्यावेळी शाहिन आफ्रिदी धावत आसिफ जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचा उत्साह वाढवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Shaheen Afridi shown sportsman spirit in PSL match)
महत्त्वाच्या बातम्या-
मिलरच्या किलर फलंदाजीला दुर्दैवी ब्रेक, गोलंदाजाच्या भेदक माऱ्याने १० फूट दूर उडाली दांडी
डोक्याला दुखापत झाल्याने फाफ डू प्लेसिसला ‘मेमरी लॉस’ची समस्या, स्वत: मांडली व्यथा
सॅम करनच्या भावाचा अविश्वसनीय झेल, हवेत सूर मारत एका हाताने पकडला अवघड चेंडू