टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 36वा सामना पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात गुरुवारी (दि. 03 नोव्हेंबर) सिडनी येथे पार पडला. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी फलंदाजी करताना शानदार फटकेबाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. मात्र, जेव्हा दक्षिण आफ्रिका संघ फलंदाजी आला, तेव्हा त्यांना रोखताना पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने विकेट्स घेताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 185 धावा चोपल्या. तसेच, दक्षिण आफ्रिकेला 186 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दोन फलंदाजांचा काटा काढत पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने खास कारनामा केला.
आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेच्या डावातील पहिले षटक टाकताना सहाव्या चेंडूवर सलामीवीर क्विंटन डी कॉक याला शून्य धावेवर तंबूत धाडले. यानंतर त्याने तुफान फॉर्मात असलेल्या रायली रूसो यालाही 7 चेंडूवर असताना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. रूसो आफ्रिदी टाकत असलेल्या डावातील तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर नसीम शाहच्या हातातून झेलबाद झाला. या दोन विकेट्स घेताच आफ्रिदीने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 50 विकेट्स पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, तो त्याने ही कामगिरी अवघ्या 22 वर्षे आणि 211 दिवसांच्या वयात केली आहे. त्यामुळे तो अशी कामगिरी करणारा सर्वात युवा वेगवान गोलंदाज बनला आहे.
https://twitter.com/TheRealPCB/status/1588120468036411393
शाहीन आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तानकडून टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 44 सामने खेळले आहेत. यातील 44 डावांमध्ये खेळताना त्याने 7.62च्या इकॉनॉमी रेटने 50 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 25 कसोटी सामने आणि 32 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 3.04च्या इकॉनॉमी रेटने 99 विकेट्स घेतल्या आहेत, तर वनडेत त्याने 5.51च्या इकॉनॉमी रेटने 62 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: संजू सॅमसनने केला टेनिस बॉलचा सराव, एकापेक्षा एक शॉट मारताना दिसला पठ्ठ्या
भारतापाठोपाठ धवनच्या खांद्यावर आयपीएलच्या ‘या’ संघाची जबाबदारी, तुम्हीही म्हणाल, ‘गब्बर छा गये तुम’