टी20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022) च्या हंगामात पाकिस्तानची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्या दोन सामन्यात त्यांना भारत आणि झिम्बाब्वेच्या हातून पराभव स्वीकारावा लागलेला. त्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. मात्र, नेदरलँड्स विरूद्ध मोठ्या फरकाने मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातले आव्हान अजूनही जिवंत आहे. आता त्यांचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आहे. पण, सामन्याच्या आधी त्यांना मोठा झटका लागला. दुखापतग्रस्त असलेला त्यांचा दिग्गज फलंदाज फखर झमान दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो पुढच्या सामन्यांना मुकणार आहे.
टी20 विश्वचषकात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरूवारी (दि.3 नोव्हेंबर) सिडनी येथे सामना खेळवला जाईल. मात्र, ऐन सामन्याच्या आधी संघांच्या डॉक्टरांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की फखर झमान (Fakhar Zaman) याला खेळवून संघाला जोखीम घ्यायची नाहीये. सध्या त्याला कोणत्याही प्रकारची इजा नाही. मात्र, तो गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाहीये. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळवता येणार नाही. झमानला 7 आठवड्यांपूर्वी झालेल्या आशिया चषकात त्याला ही दुखापत झालेली. त्यानंतर तो यातून बरा झाला आणि संघात जागा मिळवली. मात्र, त्याला खेळवून आम्हाला जोखीम पत्करायची नाहीये.
आतापर्यंत झमानने या विश्वचषकात केवळ एक सामना खेळला आहे, ज्यात त्याने नेदरलँड्स विरूद्ध 16 चेंडूत 20 धावा केलेल्या. याआधी झालेल्या भारत आणि झिम्बाब्वे विरूद्ध एकही सामना खेळला नव्हता आणि आता तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या प्लेइंग इलेवनचा देखील भाग नसणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना जिंकण खुप गरजेचे आहे. जर दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला, तर पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होईल.
झमानने आतापर्यंत खेळलेल्या 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 21.73 च्या सरासरीने 1369 धावा केल्या आहेत. ज्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या 91 अशी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काहीही म्हणा, पण रोहित कर्णधार म्हणून भारतासाठी भारीच! एकाच वर्षात जिंकले तब्बल ‘एवढे’ टी20 सामने
हा सरदार खरचं असरदार! वर्ल्डकपमध्ये दरवेळी टीम इंडियाच्या मदतीला धावलाय अर्शदीप