Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO: पराभवानंतर बांगलादेशची रडारड! विराटवरच लावला ‘फेक फिल्डींग’चा आरोप; म्हणाले, ‘त्या 5 धावा…’

VIDEO: पराभवानंतर बांगलादेशची रडारड! विराटवरच लावला 'फेक फिल्डींग'चा आरोप; म्हणाले, 'त्या 5 धावा...'

November 3, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या हंगामात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 4 सामन्यांमध्ये खेळताना 3 नाबाद अर्धशतकी खेळी केल्या आहेत. यामुळे त्याने 220.00च्या सरासरीने 220 धावा केल्या आहेत. बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध त्याने 44 चेंडूमध्ये नाबाद 64 धावा केल्या. हा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, 5 धावांनी जिंकला. या सामन्यात विराटकडून ‘फेक फिल्डिंग’ झाल्याच्या चर्चेला उधान आले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

या सामन्यानंतर बांगलादेशचा खेळाडू नुरूल हसन (Nurul Hasan) याने क्षेत्ररक्षणाचा मुद्दा उचलला. त्याने म्हटले की पंचांनी त्याकडे दुर्लक्ष केले, नाहीतर आम्हाला 5 धावा मिळाल्या असत्या. तसेच मैदान ओलसर असूनसुद्धा पंचांनी सामना खेळायला लावला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, “तुम्हाला पंचांचा निर्णय मानावच लागतो.” बांगलादेशचे खेळाडू पाऊस झाल्यावर सामना पुन्हा सुरू होत होता तेव्हा पंचांशी वाद घालताना दिसले.

फेक फील्डिंग म्हणजे काय
क्रिकेटचा नियम 41.5 च्या नुसार, सामन्यादरम्यान फलंदाजाला मुद्दाम किंवा धोक्याने थांबवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा पंच त्या चेंडूला डेड बॉल घोषित करतात. याचा अर्थ तो चेंडू अवैध असून फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा दिल्या जातात. भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशला 5 धावा मिळाल्या असत्या तर संघ जिंकला असता.

Law 41.5.1 states: “It is unfair for any fielder wilfully to attempt, by word or action, to distract, deceive or obstruct either batsman after the striker has received the ball,”

5 runs should have been awarded to Bangladesh here pic.twitter.com/t1a6Q0femn

— Kaushik Jegadeesan (@kaushik0803) November 2, 2022

ही घटना 7व्या षटकात घडली. अक्षर पटेल हे षटक टाकत होता. तेव्हा या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लिटन दास ऑफ साइडला खेळून एक धाव घेण्यासाठी पळाला. तो चेंडू सीमारेषेवर जातो आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) त्याला अडवून फिल्डरकडे थ्रो करतो. तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) याने तो चेंडू पकडल्याचा संभ्रम निर्माण केला. यावेळी पंचांनी योग्य निर्णय द्यायला पाहिजे होता, असे विधान बांगलादेशच्या खेळाडूंनी सामन्यानंतर केले.

आता प्रश्न उठतो की पंचांनी हा निर्णय लगेच घ्यायाला पाहिजे होता का, कारण तसे झाले असते तर सामन्याचा निकाल वेगळाच असता. तसेच पंचांनी जर फलंदाज दिशाहीन होत असेल तर त्यांनी त्याचक्षणी सांगणे आवश्यक आहे, मात्र या सामन्यात पंचाकडून तशी काही हालचाल दिसली नाही. जर पंचांंनी 5 धावांची पेनल्टी बांगलादेशला दिली असती तर सामना ते जिंकले असते. निकाल भारताच्या बाजूने लागला आणि गुणतालिकेत 6 गुण मिळवत अव्वल स्थान गाठले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना, ‘हा’ स्फोटक फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून बाहेर
हाय प्रेशर सामन्यात सुटले कोहलीचे नियंत्रण, धावबाद झाल्यामुळे कार्तिक अन् विराटमध्ये बाचाबाची!


Next Post
Arshdeep Singh & Team India

VIDEO: शेवटचे षटक... चौकार-षटकार आणि अर्शदीप सिंगचे 'एरोप्लेन सेलिब्रेशन'

Virat Kohli

कोहली ऍंड ऍडलेड कनेक्शन! विराटबाबत धोनीचा जुना व्हिडिओ का होतोयं व्हायरल?

Shikhar-Dhawan

भारतापाठोपाठ धवनच्या खांद्यावर आयपीएलच्या 'या' संघाची जबाबदारी, तुम्हीही म्हणाल, 'गब्बर छा गये तुम'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143