Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हाय प्रेशर सामन्यात सुटले कोहलीचे नियंत्रण, धावबाद झाल्यामुळे कार्तिक अन् विराटमध्ये बाचाबाची!

November 3, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-And-Dinesh-Karthik

Photo Courtesy: Instagram/icc


अनेकदा क्रिकेट सामन्यात खेळपट्टीवर धाव घेताना तारांबळ उडाल्यामुळे एखादा फलंदाज बाद होतो. यादरम्यानचा क्षण अगदी पाहण्यासारखा असतो. यामुळे खेळाडूंमध्ये अनेकदा खटकेही उडतात. तसेच, ते एकमेकांना मैदानावरच व्यक्त होतात. असेच काहीसे भारत विरुद्ध बांगलादेश संघात बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) ऍडलेड मैदानावर झालेल्या सामन्यात घडले. ही घटना विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्यात घडली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने बांगलादेशविरुद्धच्या डावात नाबाद 64 धावांची खेळी साकारली. रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) याने विराटसोबत डाव सांभाळला. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 67 धावांची भागीदारी साकारली. यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 38 आणि हार्दिक पंड्यासोबत 14 धावांची भागीदारी रचली. हार्दिकनंतर क्रीझवर उतरलेला दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) चांगल्याच लयीत दिसत होता. मात्र, तो 17व्या षटकात धावबाद झाला. कार्तिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये विराट आणि कार्तिकमध्ये चुकीच्या कॉलमुळे बाचाबाची झाल्याचे दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

झाले असे की, 17व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉट मारला. मात्र, चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. विराटला फुलटॉस चेंडूवर शॉट मारताना पाहून कार्तिक धाव घेण्यासाठी पळाला. मात्र, विराटने त्याला नकार दिला. यानंतर कार्तिक लगेच मागे वळला, पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. तो धावबाद झाला. धावबाद झाल्यानंतर कार्तिक उठला आणि विराटशी धाव न घेण्याबाबत विचारणा करू लागला. यावर विराटनेही इशाऱ्यात विचारले की, इथे धाव कुठे होती. यावर कार्तिकने म्हटले की, समोर पाहायला पाहिजे होते.

दिनेश कार्तिक या टी20 विश्वचषकात खास कमाल दाखवू शकला नाहीये. त्यात तो अशाप्रकारे धावबाद झाल्यामुळे निराश झाला, त्यामुळे विराटलाही धावबादबद्दल विचारणा करताना दिसला. कार्तिकने बाद होण्यापूर्वी 5 चेंडूत 4 धावा चोपल्या.

सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारताने दिलेल्या 185 धावांचे आव्हान दुसऱ्या डावात पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार बांगलादेशला 16 षटकात 151 धावांचे आव्हान मिळाले. मात्र, यावेळी बांगलादेशला 6 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करता आल्या आणि हा सामना बांगलादेशने 5 धावांनी गमावला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटचे तोंड उघडवणारा राहुलचा षटकार पाहिला का? पाहून तुमच्याही बत्त्या होतील गुल
हातात ब्रश घेऊन मैदानावर फिरणारा ‘तो’ व्यक्ती आहे तरी कोण? भारताच्या विजयात उचललाय मोलाचा वाटा


Next Post
Mohammad Rizwan & Fakhar Zaman

पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना, 'हा' स्फोटक फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून बाहेर

Virat Kohli

VIDEO: पराभवानंतर बांगलादेशची रडारड! विराटवरच लावला 'फेक फिल्डींग'चा आरोप; म्हणाले, 'त्या 5 धावा...'

Arshdeep Singh & Team India

VIDEO: शेवटचे षटक... चौकार-षटकार आणि अर्शदीप सिंगचे 'एरोप्लेन सेलिब्रेशन'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143